विमानतळावर सामान हरवण्याएवढं दुसरं दुर्दैव एखाद्या प्रवाशाचं असूच शकत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग अनुभव शर्मा नावाच्या प्रवाशावरही आला. दिल्ली विमानतळावर त्याचे सामान हरवले होते. अनेकदा सामान हरवले की ते प्रवाशांना मिळतेच असे नाही किंवा ते परत मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो त्याचे त्यांनाच माहिती नसते. पण अशावेळीही त्याचे सामान शोधण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका ऑफिसरने त्याला मदत केली आणि त्याचे सामान मिळवून दिले.

वाचा : घर की खुराडा? तरीही लोक देतात २० हजार घरभाडे

VIDEO: ट्रॅफिक जॅमला कंटाळत गुंडांनी किडनॅप केलेल्या व्यक्तीला दिलं सोडून!

अनुभवने आपला हा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. अर्थात त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर अनुभवची बॅग हरवली होती. ही बॅग मिळून देण्यासाठी सुनील कुमार नावाच्या CIFS अधिका-याने त्याला मदत केली. जोपर्यंत त्याची बॅग सापडत नाही तोपर्यंत सुनील कुमार त्याच्यासोबत होते. सुनील कुमार यांच्या कामाची वेळ कधीच संपली होती तरीही ते सुनील सोबत थांबले होते. ‘तूला मदत करणं माझं कर्तव्य आहे’ असं म्हणत सुनील यांनी अनुभवच नाही तर अनेकांचं मन जिंकलं.  विमानतळावर एकदा सामान हरवलं की ते मिळणं कठीणच त्यातून ते मिळवण्यासाठी इतर त्रास काढणंही आलंच. पण सुनील कुमारमुळे अनुभवची मात्र या वाईट अनुभवातून सुटका झाली.