‘मला की नाही जग फिरायचे आहे’, किंवा ‘आयुष्याच्या शेवटच्या दिवसात मला तिर्थयात्रा करायची आहे’, ‘मला मरणाआधी नातवंडांना पाहायचं आहे’, ‘मला मरण्याआधी नातवंडांची लग्नं पाहायची आहेत’ आयुष्याच्या शेवटच्या काळात घरातल्या आजी आजोबांच्या साधारण अशाच इच्छा अपेक्षा असतात. पण नेदरलँडच्या या आजी सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. यांना तुरूंगात जायची भारची हौस होती, अखेर आपली शेवटीची इच्छा  भाचीकडून पूर्ण करून घेण्यात त्यांना यश आले.

VIDEO: आता ‘उबर’च्या सीईओनेच ‘उबर’ चालकाशी केलं भांडण !

नेदरलँडमधल्या ९९ वर्षीय अॅनी यांना तुरुंगात जाण्याची इच्छा होती. आपल्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात आणि तुरुंगात डांबावे अशी त्यांची शेवटीच इच्छा होती. पण तुरूंगात जाणार कसं? आपण ना चोरी केली, ना कोणता गुन्हा, मग तुरूंगात डांबणार कोण? त्यामुळे ९९ वर्षीय अॅनींची इच्छा काही पूर्ण झाली नाही. अखेर ही इच्छा पूर्ण व्हायला २०१७ उजाडले. अॅनी यांची भाची पोलीस दरात कार्यरत आहे, त्यामुळे आपल्या मामीची शेवटीची इच्छा तिने पूर्ण केली.

Viral Video : नवरदेवाचा लग्नमंडपात ‘झिंगाट’ डान्स

आजीच्या हातात बेड्या ठोकून तिने त्यांना तुरूंगात डांबले, तुरूंगात जाऊन आजी एवढ्या खूश झाल्या की आनंद त्यांच्या चेह-यावरून स्पष्ट दिसत होता. त्यामुळे या हस-या कैदाचा फोटो काढून तो आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यापासून पोलिसांना राहावले नाही. गजाआडून हसणारी आजी असं लिहित त्यांनी फोटो शेअर केला. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आजींचा हा फोटो व्हायरल होत आहे.