मोठमोठ्या मंडपात, हॉलमध्ये, अलिशान हॉटेलमध्ये, समुद्रकिनारी, अगदी माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी देखील लग्न केलेल्या जोडप्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल. पण कधी स्कूटरवर लग्न केल्याचं तुम्ही ऐकलंयत का? आपलं लग्न खूप हटके पद्धतीनं व्हावं, असं स्वप्न असणाऱ्या चीनमधल्या डिलिव्हरी बॉयने एकदम हटक्या प्रकारे लग्न केलंय. त्याच्या या अनोख्या लग्नसोहळ्यान त्याने रस्त्यावरच्या लोकांचंच नाही तर जगाचंही लग्न स्वत:कडे वेधून घेतलं.

वाचा : ‘या’ देशाचे पंतप्रधान राजाला भेटायला सायकलवरून जातात

वाचा : मुख्यमंत्र्यांनी केली पोलखोल, पाहा विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांच्या सामानासोबत काय करतात

या जोडप्याने स्कूटवरच लग्न केलं. नवरदेवाचे इतर सहकारी देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याचे सहकारी डिलिव्हरी बॉईजच्या गणवेशात लग्नात आले. लग्नच स्कुटवर झाल्याने त्याचे शेकडो सहकारी स्कूटवरूनच नवविवाहित जोडप्याच्या मागे मागे फिरत होते. त्यामुळे या अनोख्या लग्नासोहळ्याने चीनच्या रस्त्यावरील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर देखील या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आता हा लग्नसोहळा खरंच होता की डिलिव्हरी कंपनीचा स्टंट हे मात्र कळू शकलं नाही.