चांगले काम करणा-या व्यक्तीचे सोशल मीडिया नेहमीच कौतुक करते, सध्या या सोशल मीडियावर दिल्लीच्या रिक्षावाल्याची चर्चा आहे. आज तो सोशल मीडियावर हिरो आहे कारण स्वच्छ भारत अभियानासाठी या रिक्षा चालकाने खारीचा वाटा उचलला आहे. रिक्षात बसून गुटखा पानाच्या पिचका-या मारणारे किंवा कचरा रिक्षातून फेकणारे अनेक प्रवाशी त्याच्या रिक्षाने प्रवास करतात आणि आजूबाजूचा परिसर घाण करतात. म्हणून या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात चक्क छोटीशी कचरा कुंडी बसवली आहे.

वाचा : पैसे नसल्याने गवंडीकाम करून बहिणींनी बांधले घरात शौचालय

फर्रुखाबादमधल्या पट्टीखुर्द गावाचे रहिवासी असलेले ३७ वर्षीय सचिन शर्मा हे दिल्लीमध्ये रिक्षा चालवतात. त्यांच्या रिक्षात बसणारे अनेक प्रवासी रस्त्यात कचरा टाकून आजूबाजूचा परिसर अस्वच्छ करतात, असे अनुभव त्यांना अनेकदा आले. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेत आपल्या रिक्षात छोटीशी कचराकुंडी बसवली आहे. रिक्षात बसणा-या प्रवशांना ते स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. आपल्या रिक्षात त्यांनी स्वच्छ भारत संदर्भात अनेक घोषवाक्ये लावली आहेत. प्रवाशांना कचरा न पसरवण्याची विनंतीही ते करतात. इतकेच नाही तर आजूबाजूच्या परिसरात कचरा न परसवण्या-या प्रवशांना ते दुपारी १२ ते ४ यावेळात मोफत इच्छित स्थळी सोडतात असेही ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने सांगितले. केवळ आपल्या प्रवाशांवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी ही मदत देऊ केली. शर्मा यांच्यावर अनेक रिक्षाचालकांनी आक्षेप घेतला. आधी त्यांनी कचराकुंडी रिक्षाच्या बाहेर लावली होती मात्र नंतर त्यांनी ती आत लावली.

वाचा : ‘फी नको पण झाडे लावा’, शाळेचा अनोखा उपक्रम

VIRAL: पुणेकरांची ‘डोकॅलिटी’, रुमालावर छापली लग्नाची निमंत्रणपत्रिका