ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येतात. उच्च दर्जाचे शिक्षण आणि जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक ऑक्सफर्ड विद्यापीठ मानले जाते, पण या विद्यापीठावर भारतीय वंशाच्या एका विद्यार्थ्याने खटला दाखल केला आहे. ‘ऑक्सफर्डमध्ये अत्यंत कंटाळवाण्या पद्धतीने शिकवले जाते. म्हणून, मला कमी गुण मिळाले. नाहितर आज माझे करिअर खूप चांगले झाले असते.’ असा आरोप या मुलाने केला आहे.

वाचा : व्हायरल झालेल्या एलियनच्या फोटोंमुळे केरळ-कर्नाटकमधील गावांत भितीचे वातावरण

भारतीय वंशाचा असलेल्या फैज सिद्धीक्की याने ऑक्सफर्ड विद्यापीठावर खटला दाखल केला आहे. वकील म्हणून माझे करिअर चांगले झाले नाही. यासाठी मला मिळालेले कमी गुण कारणीभूत असल्याचे त्याने सांगितले आहे. ऑक्सफर्डमध्ये भारतीय साम्रज्याचा इतिहास हा विषय अत्यंत रटाळवाण्या पद्धतीने शिकवला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा विषय शिकवण्यासाठी विद्यापाठीकडे ७ शिक्षक होते. पण, १९९९ ते २००० या शैक्षणिक वर्षांत यातले चार शिक्षक सुट्टीवर गेले. त्यामुळे, इतर शिक्षकांवरही शिकवण्याचा ताण होता.

परंतु ‘द संडे टाईम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार शिक्षकांच्या रटाळावाण्या शिकवण्याच्या पद्धतीनेमुळे माझे नुकसान झाले असल्याचे सिद्धीक्कीने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय वकिल म्हणून माझे करिअर बुडले आहे आणि याला विद्यापीठ जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे, फैज याने विद्यापीठाच्या विरोधात न्यायलयात खटला दाखल केला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. परंतु, ऑक्सफर्डने मात्र या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. २००० मध्येच फैज याचे शिक्षण पूर्ण झाले असून १६ वर्षांनंतर त्याने का तक्रार केली आहे? असा सवाल ऑक्सफर्डने विचारला आहे. त्यामुळे, या खटल्यावर न्यायालय काय निकाल देते याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागून आहे.

वाचा : नोटाबंदीमुळे विदेशी पर्यटकांचे हाल, लोकांचे मनोरंजन करून गोळा केले पैसे