अनेकदा जाहिरातीत जे दाखवतात प्रत्यक्षात मात्र तसे नसतेच. असेच काहीसे न्यू यॉर्कमध्ये राहणा-या अॅना या वृद्ध महिलेसोबत घडले. केएफसीच्या जाहिरातीत ‘चिकन बकेट’ ही एका कुटुंबासाठी एकवेळचे जेवण ठरेल असा दावा करण्यात आला, तसेच ही चिकन बकेट पूर्णपणे भरलेली दाखवण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र ती पूर्ण भरलेली नाही. तेव्हा खोटी जाहिरात केल्यामुळे न्यूयॉर्कमधल्या अॅना या महिलेने केएफसीकडे २ कोटी नुकसान भरपाई मागितली आहे.

अॅना यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी केएफसीची चिकन बकेट विकत घेतली, पण प्रत्यक्षात मात्र ती जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे काठोकाठ भरलेली नव्हती. तसेच त्यामध्ये असलेले मांसाचे तुकडे देखील जाहिरातीत दाखवल्यापेक्षा अतिशय लहान होते, त्यामुळे या ६४ वर्षीय विधवा महिलेने जॉर्जिया येथे असलेल्या केएफसीच्या मुख्यालयात तक्रार केली. जाहिरातीत चिकन बकेट ही भरून वाहत असल्याचे दाखवले आहे पण प्रत्यक्षात मात्र ती अर्धीच भरलेली आहे. तसेच या कंपनीने हे एका कुटुंबासाठी जेवण ठरु शकतो असा दावा केला होता पण माझ्या कुटुंबाचे पोट या अर्धवट बकेटने भरले नाही अशा प्रकारची तक्रार तिने केली आहे. अशा प्रकारची फसवेगीरी केल्याबद्दल तिने केएफसीकडे २ कोटी रुपये नुकसान भरपाई मागितली आहे. यासाठी तिने वकिलही नेमला आहे. या संपूर्ण प्रकरणात केएफसीने या महिलेची माफी मागितली असून तिला माफीचे पत्रही पाठवले आहे,