‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी ज्या जहाजाची ख्याती होती त्या टायटॅनिक जहाजाला आपल्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले. त्यानंतर आलेल्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाने या जहाजाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण केली. टायटॅनिक सापडल्यानंतर या जहाजातील अनेक वस्तुंसाठी लाखोंच्या बोली लागल्या. या वस्तूंचा संग्रह आजही जगभरातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नुकताच टायटॅनिक संदर्भातल्या आणखी एका गोष्टीचा लिलाव पार पडला.

टायटॅनिकमधूल प्रवास करणाऱ्या उच्चभ्रु वर्गातील एका प्रवाशाने हे जहाज बुडण्यापूर्वी एकदिवस आधी आपल्या आईला पत्र लिहिले होते. हे पत्र इतके वर्षे त्यांच्या कुटुंबियांनी जपून ठेवलं होतं. या पत्राचा लिलाव शनिवारी पार पाडला असून या पत्राचा जवळपास १ कोटींहून अधिक किंमतीत लिलाव करण्यात आला.
अॅलेक्सझँडर होलवर्सन यांनी आपल्या आईला पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी टायटॅनिकमधलं जेवणाची आणि संगीताची स्तुती केली होती. टायटॅनिकला अपघात होण्यापूर्वी त्यांनी पत्र लिहिलं होतं, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांची पत्नी मात्र वाचली. आपल्या आईला अॅलेक्सझँडरने लिहिलेलं पत्र त्याच्या पत्नीने जपून ठेवलं होतं. त्यानंतर या कुटुंबाने या पत्राचा लिलाव केला.

फोटोग्राफीतला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला, पण ‘या’ फोटोमागचं वास्तव भीषण

ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून १० एप्रिल १९१२ मध्ये न्यूयॉर्कला जाण्यासाठी टायटॅनिक जहाज निघाले होते. त्याकाळी जगातले सगळ्यात मोठं आणि कधीही न बुडणारे आलिशान जहाज अशी त्याची ख्याती होती. त्यामुळे साहजिकच या जहाजाला खूपच प्रसिद्धी लाभली होती. पण दुर्दैव म्हणजे ज्या जहाजाची कधीही न बुडणारे जहाज अशी प्रसिद्धी केली गेली त्या जहाजाला आपल्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. ते कधीच न्यूयॉर्कला पोहोचले नाही. १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर हे जहाज आदळले. १५ एप्रिलला अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन या जहाजाने जलसमाधी घेतली होती. यात १५०० लोक मृत्यूमुखी पडले होते.

जरी या जहाजाला जलसमाधी मिळाली अशी चर्चा असली तरी आयरिश पत्रकार सेनेन मोलॉनी वेगळेचं मत मांडलं होतं. या पत्रकाराने टायटॅनिक हे आगीमुळे बुडालं असल्याचं आपल्या संशोधनात म्हटलं होतं. बॉयलर भागात सतत आग भडकत होती त्यावेळी जहाजातील बॉयलरचं तापमान हे १ हजार डिग्रीच्या वर पोहचलं होतं. या आगीमुळे टायटॅनिकचे भाग कमकूवत झाले आणि विशाल हिमनगावर आदळताच ते तुटले असा दावा त्यांनी केला होता. मोलॉनी यांनी तीस वर्षे यावर अधिक संशोधन केलं होतं.

रशियन जोडप्याचं फोटोशूट पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल