नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोव्हेंबरनंतर ढवळून निघालेलं वातावरण काहीशी निवळण्याची चिन्हं दिसत असतानाच नवीन काहीतरी होतं आणि या मुद्दा पुन्हा चर्चेला येतो.

आता निमित्त झालंय ते ‘चिल्ड्रन्स बँक आॅफ इंडिया’चं . दिल्लीच्या संगम विहार भागातल्या एका एटीएममधून काल रोहित कुमार नावाच्या एका तरूणाला २००० रूपयांच्या खोट्या नोटा मिळाल्या. या नोटांचा रंग आकार जवळपास खऱ्या २०००च्या नोटांसारखाच असला तरी त्यावर रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया च्या एेवजी ‘चिल्ड्रन्स बँक आॅफ इंडिया’ असं लिहिलेलं होतं. अर्थातच या नोटा खोट्या होत्या. याविषयी आता पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला जाऊन तपास सुरू असला तरी यावरून ट्विटरवर अपेक्षेप्रमाणे हलकल्लोळ माजला आहे. सगळेजण या चिल्ड्रन्स बँक आॅफ इंडिया च्या नोटांवरून जोक्स मारत आहेत.

याआधीही २००० च्या खोट्या नोटा मिळण्याचे प्रकार घडले आहेत. काही दिवसापूर्वी एका ठिकाणी मिळालेल्या नोटांवर रिव्हर्स बँक आॅफ इंडिया लिहिलं होतं. आधी रिझर्व्ह मग रिव्हर्स आणि आता चिल्ड्रन्स बँक आॅफ इंडिया असा प्रवास झालेल्या या नोटांबाबत या ट्वीटमध्ये खिल्ली उडवली आहे.

 

नव्या नोटा जेव्हा आणल्या गेल्या तेव्हा या नव्या डिझाईनच्या खोट्या नोटा बनवणं अवघड असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. आता एटीएममधूनच खोट्या नोटा येत आहेत.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निमित्ताने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती त्यावरूनही लोकांनी ट्वीट करत जोक्स मारले

अती झालं आणि हसू आलं अशातलाच प्रकार झालाय या नोटाबंदीबाबत