इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप जगभरात तुफान प्रसिद्ध आहे. आपल्या व्यवसायाच्या प्रमोशनमपासून ते इतर प्रसिद्धीसाठी कंपन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच सर्रास या अॅपचा वापर करतात. फोटो शेअरिंग अॅप असल्यानं युजर्स यावर फोटो शेअर करून व्यक्त होतात. पण हेच फोटो शेअर करणं एका मॉडेलला भलतंच महागात पडलं आणि यामुळे तिचं अकाऊंट गेल्या वर्षाभरापासून तिसऱ्यांदा इन्स्टाग्रामने बंद केलंय.
अमेरिकेतील मॉडेल एले जॉनसन हिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाऊंटवरून ती अनेकदा मादक फोटो अपलोड करते. या फोटोंवर लाखोंच्या संख्येनं लाईक्सचा पाऊस पडत असला किंवा हजारोंनी कमेंट्स येत असल्या तरी तिचं अकाऊंट पुन्हा एकदा कंपनीनं निलंबित केलंय. अंगप्रदर्शन करणारे फोटो अपलोड करणं हे नैतिकतेविरुद्ध आहे, त्यातून तिनं सोशल मीडियार ‘फ्री द क्लिवेज’ ही नवी मोहिम सुरू केलीय. हा हॅशटॅग वापरून ती मादक फोटो वारंवार तिथे अपलोड करते आणि यासारख्या अनेक कारणांमुळे तिच्यावर बंदी घालण्यात आलीये.

यावर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात तिचं अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर लागोपाठ चार महिन्यांनी एप्रिलमध्येही फोटोंमुळेच इन्स्टाग्रामकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण जणू आपल्याला याचा काहीच फरक पडत नाही अशाच अविर्भावात ती वावरत होती. ही कारवाई होऊनही इन्स्टावर तिचे मादक फोटो अपलोड करणं काही थांबलं नाही. त्यामुळे नाईलाजानं पुन्हा एकदा तिच्यावर इन्स्टाग्रामकडून बंदी घालण्यात आली.