खायचा मासा म्हटले की साधारण आपल्या तळहाताएवढा किंवा अगदी आपल्या पूर्ण हाताइतका असतो. मग मासे विकत आणून ते साफ करुन त्याचा बनवलेला पदार्थ आणि त्याचा घेतलेला आस्वाद काही औरच. पण मासेमारी करताना महाकाय मासा तुमच्या हाती लागला तर?

उत्तराखंड राज्यातील आलमोरा तालुक्यातील स्थानिकांना रामगंगा नदीत मासेमारी करत असताना मोठा मासा मिळाला. हा मासा बाहेर काढताना त्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. कारण हा मासा साधासुधा नसून तब्बल १२५ किलोचा होता. या इतक्या मोठ्या माशाला पाहून मासेमारी करणारेही थक्क झाले. त्याला बाहेर काढल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्यासोबत व्हिडिओ सेल्फी काढले. त्यानंतर काही फोटो व व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. हे फोटो अखेर वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी या मासेमारांना चांगलेच फैलावर घेतले.

police arrest suspected killer in double murder case
चिखलात लपून बसलेल्या संशयित खुनीला पकडले
Pune police, robbed, citizens, Gulf countries, gang, from Delhi, pretending, policemen,
पुणे : अरबी भाषेत संवाद साधून आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड
Uddhav Thackeray criticized PM Modi
शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात

या सर्व प्रकरणाचा तपास घेण्यासाठी वनअधिकाऱ्यांची टीम आलमोरा गावात दाखल झाली. मासा कुठे आहे असे जेव्हा अधिकाऱ्यांनी विचारले तेव्हा गावकरी काहीसे गोंधळले. कारण एव्हाना हा मासा त्यांनी फस्तही केला होता. हो, इतका मोठा मासा मिळाल्याने गावकऱ्यांनी मिळून त्याचा फडशा पाडला होता. रामगंगा नदी हे मासेमारीसाठी प्रतिबंधित क्षेत्र असून गावकऱ्यांनी परवानगी न घेता त्या माशाची शिकार केली.
आलमोरा तालुख्यातील वन अधिकारी व पोलीस याप्रकरणी आणखी चौकशी करत आहे. आतापर्यंत चार स्थानिक रहिवाशांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वन अधिकारी व पोलीस सखोल चौकशी करीत आहे.

गावकऱ्यांना मिळालेला मासा हा डेव्हिल कॅटफीश प्रजाती असण्याची शक्यता आहे. माशाची ही प्रजाती नदीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असते. प्रतिबंध असलेल्या क्षेत्रात संरक्षित प्रजातींची हानी होत असल्यामुळे अशापद्धतीने मासेमारी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली जाईल. तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यत कारावास होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.