९० च्या दशकात शाळा काॅलेजमध्ये असलेल्या सगळ्या मुलामुलींना हे दशक गाजवणाऱ्या एक महान गायकाची चांगलीच ओळख आहे. याने केबल टीव्हीचं हे दशक गाजवलं. त्याच्या गाण्याने लाखोंची झोप उडाली. आयुष्यात सगळं काही गमावलेल्या, निराशेने ग्रस्त लोकांना याचं गाणं टीव्हीवर पाहिलं की आयुष्यात किती मजेदार गोष्टी आहेत याची नव्याने जाणीव व्हायची. याचं नाव आहे बाबा सेहगल. भारताचा पहिला ‘रॅपर’ म्हणून बाबा सेहगलला ओळखलं जातं.

याने काय करायचं बाकी ठेवलं होतं त्या काळात?  निधड्या छातीने समोर टेबलफॅन लावून आपल्या मादक अदांनी दर्शकांना त्या टेबलावर ठेवलेलं ‘ठंडा ठंडा पानी’ पिण्यासाठी याने आग्रह केला.

Farmer Crying Viral Video
VIDEO: डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् अवकाळीचा फटका; पीक पाहून शेतकरी ढसाढसा रडला
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
मिलिंद सोमणला टक्कर? (छाया सौजन्य- पिंटरेस्ट)
मिलिंद सोमणला टक्कर? (छाया सौजन्य- पिंटरेस्ट)

 

वेगवेगळे पोषाख घालत म्युझिक व्हिडिओमधल्या मुलींना इम्प्रेस करायचा प्रयत्न केला.

 

हरहुन्नरी अवलिया
हरहुन्नरी अवलिया

 

आणि एकूणच धुमाकूळ घातला.

काही वर्षांपूर्वी ‘बिग बाॅस’मध्ये आलेला आणि मध्येच उगवणारा हा बाबा सेहगल आता काय करतो? तर आता हा आपले व्हिडिओज् वेबसाईट आणि यूट्यूबवर पोस्ट करतो आणि आपलं कवित्व ट्विटरवर मांडत असतो. तर बाबा सहगलच्या काही ‘कविता’ पाहा

 

१. तुम आए जिंदगी में, बात बन गयी

    समोसा में चटनी डाली, चाट बन गयी

 

 

 

२.  बेटर होगा अगर करोगे योगा

      क्योंकि जो होना है वो तो होगा

 

 

३. तेरे दिल के यूट्यूब चॅनल का मैं भी हूँ सबस्क्रायबर,

     बेबी अच्छी हेल्थ के लिए रोज खाया कर फायबर

 

 

४. निगेटिव्हिटी को लाईफ से किक करो

    बिस्किट को चाय में डिप करो

    ब्रेकफास्ट कभी मत स्किप करो

बाबा सेहगल सामाजिक समस्यांवरही गाणी बनवतो. वरच्या त्याच्या कविता वाचून तुम्ही जिवंत राहिला असाल तर नोटाबंदीवर त्याने बनवलेलं हे गाणं पाहा

 

 

कळले त्याला लेजंडरी का म्हणतात ते? याने गेले वीस वर्ष धुमशान घातलंय. ९० च्या दशकाच्या नाॅस्टॅल्जियामध्ये बाबा सेहगलला महत्त्वाचं स्थान आहे.