सध्या लग्नाचा मोसम आहे. लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण. आपल्या लाईफ पार्टनरसोबतची आपली रिलेशनशिप एका नात्यामध्ये या दिवशी बदलणार असते. या दिवशी आपलं सगळं घरचं जणू आपल्यासाठी आनंदात असतं. आपल्यासाठी होणारा हा सोहळा चांगल्या पध्दतीत पार पडावा यासाठी हे सर्वजण प्रयत्नांची शिकस्त करतात.

नवरा नवरीसाठी तर हा दिवस तर आपले सगळे लाड पुरवून घेण्याचा असतो. आपल्या जीवनातल्या या खास दिवशी सगळे सोहळे करवून घेण्यासाठी नवरा आणि नवरी उत्सुक असतात.

आता या नवरीचंच घ्या ना. आपल्या लग्नामध्ये करण्यासाठी एक विशेष डान्स तिने बसवला होता. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर या नवरीने केलेला नाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गाण्यावर ही नवरी असे ठुमके देते की बास रे बास

 

 

आपल्या लग्नात आपली हौस पुरवून घेणाऱ्यांपैकी ही पहिलीच नाही. काही दिवसांपूर्वी स्वत:च्याच लग्नात ‘सिंहाच्या पिंजऱ्यावर’ बसून येणारा नवरदेवही आपण सगळ्यांनी पाहिला होता.  म्हणजे शौर्य तर दाखवायचं, पण थेट सिंहावर बसण्याची हिंमत नाही. अशा वेळेला काय? सिंहाच्या पिंजऱ्याच्या वर बसून येण्याचा मध्यममार्ग या पठ्ठ्याने काढला होता.

 

 

आता त्याहीआधी  स्वत:च्याच लग्नात डब्ल्यूडब्ल्यूई च्या ‘ट्रिपल एच’ च्या स्टाईलने एंट्री घेणारा पाकिस्तानातला नवरदेवही सगळ्यांनी पाहिला होता. नसेल पाहिला तर आता पहा.

 

हौसेला मोल नाही याचा यापेक्षा ढळढळीत पुरावा शोधून सापडणार नाही. हे प्रकार हास्यास्पद असले तरी त्याने लग्नसमारंभात वेगळीच जान  येते.

अर्थात त्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यावर वगैरे बसून येण्याची गरज नाही.  त्याने भलतंच हसं होईल.