दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या आयुष्यातला हा काळ विचित्र असतो. ती धड मोठी नसतात की धड लहान नसतात. उत्साहाच्या नादात कुठलंही स्टंट करायचा मोह त्यांना आवरत नाही.नुकतंच आपल्या आसपास काय चाललं आहे त्याचं भान येण्याच्या काळात ही मुलं कुठल्याही अपघातात सापडू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे अतिशय महत्त्वाचं ठरतं. असं झालं नाही तर या सगळ्यांच्या जिवावर बेतू शकतं, आणि मोठी कठीण परिस्थिती उद्भवू शकते.

चीनमध्येही असंच काहीसं  झालं. एका विचित्र अपघातात एक मुलगी तिच्या घराच्या गॅलरीच्या ग्रिल्समध्ये अडकली. तिचं डोकं या ग्रिल्समध्ये अडकलं होतं. ग्रिल्समध्ये ही मुलगी असी कशी अडकली हे कोणालाच कळत नव्हतं. अशा पध्दतीने फार काळ ही मुलगी राहिली असती तर तिच्या जिवावर नक्कीच बेतलं असतं. तिच्या मानेला जोराचा हिसडा बसून तिच्या कण्याला दुखपतही झाली असती

पण याच वेळी दोघा तरूणांनी या मुलीचा जीव वाचवला. यातल्या एका तरूणाने या ग्रिल्सच्या खालच्या पॅरापिटवर चढत या मुलीला आधार दिला. यामुळे तिच्या मानेवरचा ताण कमी झाला. तर दुसऱ्या तरूणाने तिच्या घरात जाऊन प्लायरने ग्रिल्स कापले आणि हळूहळू या मुलीला तिच्या या विचित्र अवस्थेतून सोडवलं. या बिल्डिंगच्या समोर राहणाऱ्या एका माणसाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलवर शूट केली. हा  व्हिडिओ इंचरनेटवर व्हायरल झालाय. पाहा या मुलीची सुटका कशी झाली ती

सौैजन्य- यूट्यूब

ही मुलगी या अवस्थेत कशी सापडली याचा अजून खुलासा झालेला नाही. पण एकूणच हा प्रकार बघता कोणी कुठल्याही स्टंट करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत पडू नये.