सोशल मीडियावर विषारी साप आणि कोळ्याच्या झुंजीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सापापेक्षाही १० पटीने लहान असलेल्या या कोळ्याने त्याला जाळ्यात असे काही अडकवले की बघणा-याचाही श्वास काही काळ रोखेल. आतापर्यंत साप मुंगूसाची लढाई तुम्ही पाहिली असेल पण कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या सापाची झुंज यापूर्वी कधीही पाहिली नसेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत चाळीस लाखांहूनही अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

Viral Video : घोरपडीच्या सुटकेचा थरार तुमचा श्वास रोखून धरेल!

ऑस्ट्रेलियातल्या एका स्टोअर हाऊसमधला हा व्हिडिओ आहे. कोळ्याच्या जाळ्यात एक विषारी साप अडकतो आणि सुरू होतो या सापाचा सुटकेसाठी थरार. एरव्ही ऑस्ट्रेलियातली विषारी प्रजाती म्हणून ओळख असलेला हा साप कोळ्याच्या जाळ्यात सापडल्यावर मात्र हतबल होतो. आपल्या एका दंशाने कित्येक जीवांचे प्राण घेणा-या या सापाची दहशत आहे. पण त्याला काही मिनिटांत या कोळ्याने चीत करून टाकले.

VIDEO : घोरपडीच्या सुटकेचा थरार रेकॉर्ड करायला कॅमेरामनला लागली दोन वर्षे

एका क्षणाला हा साप कोळ्याच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी यशस्वी होतो असं वाटतं पण दुस-याच क्षणाला हा कोळी आपल्या जाळ्यात शिकारीला गुंतवून ठेवलो. अन् योग्य ती वेळ साधून सापाला दंश करतो. काही सेंकदातच या सापाची धडपड बंद होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.