जगात अशक्य असे काहीच नसते फक्त ते साध्य करण्याची इच्छाशक्ती हवी आणि व्हिएतनामच्या या जुळ्या भावाने अशक्य अशी गोष्ट साध्य करून दाखवली आहे. अत्यंत अवघड असा स्टंट करत त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदून नवा इतिहास रचला आहे.

वाचा : तब्बल ७४२४ किलोमीटर सायकलने प्रवास करून आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने मोडला विश्वविक्रम

आज फेसबुक, युट्युब, व्हॉट्स अॅप, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर दोन व्हिएतनामी भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्या भावाला डोक्यावर उचलत संतुलन साधत या दोन्ही भावांनी नवा विश्वविक्रम रचला. आपल्या भावाच्या डोक्यावर डोके टेकवून कमालीचे संतूलन साधत व्हिएतनामच्या दोन्ही भावांनी स्पेनमध्ये नवा विश्वविक्रम रचला. व्हिएतनामचा जिएँग क्वाक नाइप आणि जिअँग क्वाक को या दोन्ही भावाने संतुलन साधत सेंट मेरी चर्चच्या ९० पायऱ्या चढल्या. त्यांची ही संतुलन साधण्याची पद्धत ‘हेड टू हेड बॅलेंन्सिंग’ म्हणून ओळखली जाते.

हेड टू डे बॅलेंन्सिंग करत ९० पायऱ्या चढण्यासाठी त्यांना फक्त ५२ सेकंद लागले. त्यांची ही अनोखी संतुलन साधण्याची पद्धत तिथे जमलेले चकित होऊन पाहत होते. याआधी २०१४ मध्ये चीनमधल्या टँग टाओ आणि सू झेंझीआनने हेड टेू हेड बॅलेंसिंग करत विश्वविक्रम साधला होता तेव्हा या दोघांनी २५ पाय-या चढल्या होत्या. पण व्हिएतनामच्या जिएँग क्वाक नाइप आणि जिअँग क्वाक को या दोन्ही भावांनी हा विश्वविक्रम मोडीत काढला. गेल्या १५ वर्षांपासून ते या स्टंटचा सराव करत आहेत. हा स्टंट करताना त्यांना अनेकदा अपघात आणि गंभीर दुखापती झाल्यात. पण त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर त्यांना यात यश आले आणि हेड टू हेड बॅलेंन्सिंगमध्ये विश्वविक्रम आपल्या नावावर करून घेतला.

वाचा : दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम