उत्तर भारतात थंडीची लाट आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून तर उत्तर भारतात तापमान अत्यंत खाली उतरले आहे. काही ठिकाणी  तर थंडीमुळे दाट धुक्याची चादर देखील पसरली आहे. या कडाक्याच्या थंडीने माणसे गारठून गेली आहे. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी कोणी शेकोटीची ऊब घेत आहे, तर कोणी उबदार वस्त्रे घालून आपले संरक्षण करत आहे. पण या कडाक्या्च्या थंडीत प्राण्यांची हालत काय होत असेल याची कल्पना केलीय का कधी? म्हणून मथुरामधल्या काही महिला आणि येथल्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत थंडीपासून बचाव करण्यासाठी हत्तींकरता स्वेटर विणले आहेत. हे स्वेटर विणण्यासाठी गावकरी महिला गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत करत आहेत.

वाचा : ब्रिटिशांना चकवा देत नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ‘या’ गाडीतून केले होते पलायन

वाचा : ‘हा’ टायपिस्ट बोटांनी नाही तर नाकाने टाईप करतो

मथुरामध्ये हत्तींचे पुनर्वसन केंद्र आहेत. या केंद्रात जवळपास २० हत्ती आहेत. यातील काही हत्ती जखमी अवस्थेत येथे आणले होते. शिकार आणि तस्करांच्या तावडीतून वाचवलेल्या हत्तींना या पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले. यातल्या काही हत्तींना डोळ्यांनी नीट दिसतही नाही. येथे त्यांची काळजी घेतली जाते. या पुनर्वसन केंद्राच्या बाजूला राहणा-या गावकरी महिलांनी थंडीपासून हत्तींचे संरक्षण व्हावे यासाठी स्वेटर विणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते हत्तीसाठी स्वेटर विणत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे. अनेक ठिकाणी पारा हा १० अंश सेल्शिअसच्याही खाली आहे. तेव्हा हत्तीचे संरक्षण करण्यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेत हत्तींसाठी स्वेटर विणले आहेत.

VIRAL : कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांसाठी स्थानिकांनी देऊ केली मायेची ऊब

वाचा : त्याने ७३५ भटक्या कुत्र्यांना दिले जीवनदान