आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त लग्न नसतं, तर तो आपली ‘शान’ दाखवण्याचा एक मोठा चान्स असतो. यासाठी लाखोंची धुळवड केली जाते. आपलं पोरगं भले फक्त दहावी पास असेल पण त्याच्या लग्नासाठी लाखोंचा चुराडा. आयुष्यात फक्त लग्नसमारंभात भेटणाऱ्या नातेवाईकांना आपली श्रीमंती किंवा ‘वट’ दाखवायला नको का?

यासाठी वाटेल ते केलं जातं. मोठा हाॅल किंवा मैदान, चकाचक व्यवस्था, जबरदस्त जेवण, नवरानवरीसाठी लाखोंचे ड्रेसेस असा जंगी माहौल असतो. हे दोघे कसे चालतात-बोलतात, मंडपात कसे येतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यात आपली हौससुध्दा हे लोक पुरवून घेतात.

VIDEO: स्वत:च्याच लग्नात ‘ट्रिपल-एच’ स्टाईलने एंट्री!

पुढे आयुष्यात मिरवायला मिळेल न मिळेल. लग्नात सगळी हौस पुरवून घ्यायची.

पाकिस्तानमधल्या ‘ट्रिपल एच’च्या फॅनच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात. आता पुढचं प्रकरणसुध्दा पहा.

लग्नात घोड्यावर, फेरारी गाडीवर बसून वगैरे कोणीही येईल. पण नवरा थेट सिंहावर बसून आला तर किती मोठं स्टाईल स्टेटमेंट होईल त्याचा विचार करा! मस्त आयडिया आहे ही!

या आयडियामध्ये एकच छोटासा प्राॅब्लेम असा आहे की या सिंहाने त्याच्या पाठीवर बसलेल्या नवऱ्यावर हल्ला केला तर लग्नाआधीच बिचारा मारला जायचा, नाहीतर कायमचं अपंगत्त्व यायचं

स्टाईल तर मारायची आहे पण सगळी सुरक्षितता पाळून, या गहन समस्येवर पाकिस्तानमधल्या एका नवऱ्यामुलाने शोधून काढला. आपल्या लग्नामध्ये तो ‘सिंहाच्या वर’ बसून आला.

म्हणजे सोपं आहे, त्याने काय केलं एक (पिंजऱ्यातला) सिंह मागवला. आणि त्या पिंजऱ्यावर त्याने आपली खुर्ची टाकून वरातीतून ‘दिमाखात’ मंडपात प्रवेश केला. पाहा माऊलींचा प्रताप

सौजन्य – यूट्यूब

पिंजऱ्यावर बसलेलं ते ध्यान आणि पिंजऱ्यातला तो अस्वस्थ सिंह पाहिल्यावर हा सगळा प्रकारच विचित्र वाटतोय. यामुळे या नवऱ्याची शान वाढण्याएेवजी त्याचे सासरचे फिदीफिदी हसले असतील.

वाचा- प्रपोजसाठी कायपण!

आपल्या पुढच्या जीवनात त्याने याचं सिंहावलोकन करणं आवश्यक आहे.

वाईट जोकनंतर मूड सुधारायला चांगला व्हिडिओ परत पाहणंसुध्दा फायदेशीर आहे.