जंगलात शिकारीला वगैरे जाणं हा काही आपल्या जीवनाचा भाग नाही. भारतात शिकारीच्या गोष्टी आपण आता गोष्टीच्या पुस्तकातच वाचतो. पण ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये काही मोसमामध्ये शिकारीची परवानगी असते.

ऑस्ट्रेलियामधल्या एका जंगलात एक माणूस रानडुकराच्या शिकारीसाठी गेला होता. त्यावेळी त्याने आपले दोन कुत्रेही नेले होते. यातला एक कुत्रा गायब झाला. या कुत्र्याला शोधण्यासाठी हा माणूस त्याच्या गाडीने त्या जंगलभर फिरत राहिला. शेवटी त्याला त्याचा कुत्रा सापडला. पण या कुत्र्याला एका कांगारूने पकडून ठेवलं होतं.

आता कांगारू काही हिंस्त्र प्राणी नाही. पण हा कांगारू जरा जास्तच डेअरिंगबाज होता. त्याने त्या कुत्र्याच्या गळ्याभोवची आपले हात घट्ट पकडून ठेवले होते. या कांगारूच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने अनेक वेळा धडपड केली. पण त्याचा फायदा झाला नाही. आपल्या कुत्र्याला संकटात पडलेलं पाहत त्याचा मालक धावत त्याच्याकडे गेला आणि यापुढे काय झालं ते व्हिडिओमध्येच पाहा

सौजन्य- यूट्यूब 

हा माणूस आपल्याकडे येतोय म्हटल्यावरही सुरूवातीला या कांगारूने त्या कुत्र्याला सोडलं नाही. शेवटी कुत्र्याचा मालक आपल्याकडे आल्यावर त्याने त्या कुत्र्याला सोडलं. पण त्या माणसाकडेही तो आक्रमकतेने पाहायला लागला. पण या माणसाने साट्कन त्या कांगारूच्या कानाखालीच मारली आणि त्या कांगारूच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. हे या अतिशय विनोदी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
निसर्ग विचित्र गोष्टींनी भरलेला आहे. एक कांगारू एका कुत्र्याचा गळा दाबतो काय आणि मग त्या कांगारूला हा माणूस थोबाडी मारतो काय. सगळंच विचित्र!