जगातला सगळ्यात मोठा प्राणी कुठला? यावर ‘देवमासा’ असं शाळेत एका सुरात उत्तर दिल्याचं आठवत असेल तर तुम्ही बुध्दिमान आहात.

प्रत्यक्षात देवमाशापेक्षाही मोठे जलचर खोल समुद्रात असल्याचं सांगितलं जातं आणि जगातल्या महासागरांच्या सगळ्याच तळांपर्यंत मानवाची यांत्रिक उपकरणं मोजमापासाठी पोचली नाहीयेत अजूनही.

समुद्राखाली असणारे प्राणी वगैरे असू देत पण जमिनीवरही असे आश्चर्यचकित करणारे प्राणी खूप दिसतात. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक प्राणी असतात ज्यांच्याकडे पाहून ‘हे जन्माला कसे आले’ याचं जाम आश्चर्य वाटतं! पण आहेत असे प्राणीही या जगात त्याला आपण काय करणार?

तर असो. जगातल्या अनेकत चमत्कारिक प्राण्यांचे फोटोज् आणि व्हिडिओज् आपण पाहत असतो. यातले काही प्राणी हे निसर्गत:च तसे असतात तर काही प्राण्यांच्या प्रजातीमध्ये मानवी हस्तक्षेपाने संकर करत नवीनच जात जन्माला आणली जाते. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये ‘वाघ’ आणि सिंहाचा संकर करत ‘लायगर’ (लायन + टायगर) हा खराखुरा प्राणी तयार केला गेला होता.

वाघसिंह फार दूरची बात. सध्या एका कोंबड्याच्या व्हिडिओने जगभरातल्या नेटयूझर्सचे डोळे पांढरे केले आहेत. हा कोंबडा जाम मोठा आहे. एरव्ही आपण वीस फुटांवर असलो तरी कोंबडे पळून जातात. पण हे प्रकरण समोर आलं तर भाऊ आपली तंतरेल. पाहा हा व्हिडिओ

सौजन्य – यूट्यूब

हा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर तुफान व्हायरल झालाय. जवळजवळ ७ कोटी वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय. हा कोंबडा इतका मोठा कसा काय याचा सगळेच नेटिझन्स विचार करत आहेत.

काहीजणांनी म्हटलंय की हा खरा कोंबडा नसून कोंबड्याच्या वेशातला एका माणूस आहे. पण व्हिडिओ पाहून तसं वाटत नाहीये हे खरं. माणसाने प्राण्याचा वेश घालून कितीही नक्कल करण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या बारीक हालचालीतून तो खरा प्राणी नाही आहे हे लगेच कळतं वरचा व्हिडिओ पाहून तसंही वाटत नाहीये.

रशियामधल्या कोसोवो प्रांतातल्या हा व्हिडिओ आहे. आता रशियामध्ये कोंबड्यांना कृत्रिमपणे मोठं करत त्याचा हेरगिरीसाठी वापर करण्यात येणार असल्याची आरोळीही कोणी ठोकली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.व्हायरल के जमाने में सबकुछ चलता है.

पण सनी देओलचा ढाई किलोच्या हातासारखंच  या कोंबड्याची बांग जर सकाळी कोणी एेकली तर तो माणूस झोपेतून उठणार नाही तर ‘उठून जाईल’ हे नक्की.