औषध घ्यायचं म्हटलं की आधीच आपलं तोंड वाकडं होतं. त्यातून औषधाचे कडू कडू डोस पोटात गेले की आपल्या चेहऱ्याचा असा काही रंग बदलतो की विचारायची सोय नाही. हे वाचताना तुम्हाला तुमचा अनुभव आठवत असेल. आता औषध म्हटलं की ते घेताना आपण एवढी टाळाटाळ करतो तर प्राणी काय करतील बरं! हे जाणून घ्यायचं आहे तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. चीनमधल्या एका प्राणीसंग्रहालयातला हा व्हिडिओ आहे. पिंजऱ्यात असलेल्या पांड्यांना संग्रहालयाचा कर्मचारी औषध भरवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा हे पाहून पांडा असे पळ काढत होते की विचारायची सोय नाही. तरी बिचारा हा कर्मचारी जबरदस्ती या पांडाला औषध भरवत होता.

पण या पांडाने मात्र काही हार मानली नाही त्याने शेवटपर्यंत काही आपलं तोंड उघडलं नाही. मित्रावर सक्ती होतेय म्हटल्यावर पिंजऱ्यात असणारा दुसरा दोस्त देखील आपल्या दोस्ताच्या मदतीला धावून आला आणि या दोघांनी या कर्मचाऱ्याला पुरतं हैराण केलं. पण औषध काही घेतलं नाही. याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला औषध घेतानाचे तुमचे लहानपणीचे दिवस आठवतील हे नक्की!