शहरांमध्ये आता ‘ओला’ आणि ‘उबर’ हे परवलीचे शब्द झाले आहेत. कुठेही जायचं असेल तर नेहमीच्या टॅक्सी-रिक्षाने (नेहमीप्रमाणे) नकार दिला तर उबर टॅक्सी करणं कधीही सोयीचं पडतं. कसलं टेन्शन नाही. आॅनलाईन पेमेंटचा आॅप्शनसुध्दा असतो. एकदा बसलं की आपल्याला हवं ते ठिकाण आल्यावर उतरायचं. कशाची काही चिंता नाही. पण कधीतरी या ड्रायव्हरशीही आपली भांडणं होतात. हव्या त्या ठिकाणी पोचवलं नाही म्हणून किंवा आणखी काही कारणामुळे या टॅक्सीवाल्यांशीही ग्राहकांचे खटके उडतात.

पण आता उबरच्या सीईओनेच उबर ड्रायव्हरशी वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सगळीकडे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

उबरचा सीईओ ट्रॅव्हिस कॅलॅनिकने नुकतीच आपल्या मोबाईलमधल्या अॅपवरून उबर टॅक्सी मागवली. त्याच्यासाठी एक खास आलिशान काळी गाडी येऊन दाखल झाली. कॅलॅनिकसोबत त्याच्या दोन मैत्रिणीही होत्या. त्यांचं त्यांच्यात्यांच्यात बोलणं सुरू होतं. उबर कंपनी हल्ली अनेक वादांमध्ये सापडली आहे असं त्याच्या मैत्रिणींनी म्हटल्यावर ‘मला कठीण परिस्थितींमधूनच कंपनीला बाहेर काढायला आवडतं’ वगैरे जोक मारत या सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या.

वाचा- हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही!

आता ट्रॅव्हिस कॅलॅनिकचं बॅडलकच म्हणायचं की आपल्या दोन सुंदर मैत्रिणींसोबत फिरायला जात असतानाच त्याला त्याच्या कंपनीसाठी काम करत वैतागलेला ड्रायव्हर मिळावा. त्यावेळी ती गाडी चालवत असलेला कमाल या नावाचा हा ड्रायव्हर २०११ पासून ‘उबर’टॅक्सी चालवत आहे. पण या धंद्यातून मिळणाऱ्या मोबदल्याविषयी तो नाखूष होता. मागच्य सीटवर बसलेल्या सीईओने ‘लंबी लंबी फेकायला’ सुरूवात केल्यावर कमालने आपली नाराजी कॅलॅनिककडे स्पष्ट केली. त्यावरून त्याचं आणि कॅलॅनिकचं मोठं भांडण झालं. हा सगळा प्रकार कमालच्या गाडीतल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि इंटरनेटवर व्हायरल झाला. पाहा हा व्हिडिओ

सौजन्य-यूट्यूब

त्यादिवशी त्या ड्रायव्हरला शिव्या देत आपल्या दोघा सुंदर मैत्रिणींसोबत निघून गेलेले कॅलॅनिकसाहेब त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पाहताच जाम तंतरले. दुसऱ्या दिवशी त्याने कंपनीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कमालची जाहीर माफी मागितली.

अमेरिकेत गेले काही महिने उबर कंपनी अनेक कारणांमुळे वादात सापडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार मंडळात सामील झाल्याने सीईओ ट्रॅव्हिस कॅलॅनिकवर टीका होतच होती. पण काही दिवसांपूर्वी उबरला रामराम ठोकणाऱ्या एका महिला इंजिनिअरने उबरमध्ये झालेल्या लैंगिक छळवणुकीविषयी इंटरनेटवर जाहीरपणे लिहिल्याने उबरच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. आता खुद्द उबरच्य़ा सीईओचा हा असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘ब्रँड उबर’ची आणखी वाट लागली असल्याचं दिसतंय.