भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज विराटचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारी लाखो मुलं तुम्हाला दिसतील. ‘मला की नाही विराट कोहली सारखा स्टार क्रिकेटर व्हायचं आहे.’, ‘मला विराट कोहली आवडतो’, असं क्रिकेटचं वेड असणारी मुलं सहज सांगतील. भावी क्रिकेटर्ससाठी आदर्श असलेल्या विराटानं आपल्या तरुण चाहत्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. एका कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला की, आताच्या पिढीला गॅझेट्पासून एक सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज आहे. गॅझेट्, व्हिडिओ गेम्स याच्या आहारी जाऊन जास्तीत जास्त वेळ या सगळ्यावर खर्च करण्यापेक्षा मुलांनी घराबाहेर पडून शारीरिक श्रम केले पाहिजेत.

वाचा : पुणेरी पुणेकर! असं फक्त पुण्यातच होऊ शकतं…

‘हल्लीच्या मुलांच्या हातात सतत फोन असतो. पण आमच्या लहानपणी आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ मैदानी खेळ खेळण्यात घालवायचो. मैदान, रस्ते जिथे जागा मिळेल तिथे आम्ही खेळायचो. मला आठवतंय माझ्या लहानपणी क्वचितच एखाद्या मित्राच्या घरी व्हिडिओ गेम असायचा. मग एखादा दिवस ठरवून आम्ही सगळे मित्र त्याच्या घरी जायचो आणि व्हिडिओ गेम खेळायचो. पण घरात बसण्यापेक्षा सर्वाधिक वेळ आम्ही मैदानातच असायचो.’ असंही विराट म्हणला.

हल्लीची मुलं व्यायाम करत नाही किंवा मैदानात जाऊन खेळतही नाही. गॅझेट्स मोबाईल फोनच्या आहारी जाऊन ते आपलं बालपण वाया घालवत आहेत, तेव्हा विराटनं सध्याच्या पिढीबद्दल असलेली नाराजी मांडली आहे आणि मुलांना लवकरात लवकर यासगळ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा : अधुरी एक कहानी!; लग्नाच्या दोन आठवड्यांपूर्वीच तिचा मृत्यू झाला