सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कोण कोणत्या गोष्टीला हात लावता हे माहित आहे का? बस, ट्रेन, रिक्षा, दरवाजे यांसारख्या अनेक गोष्टींना आपण कळत नकळत हात लावत असतो. आपण अशा अनेक गोष्टींना हात लावत असतो ज्यांना आपल्याआधी अनेकांनी हात लावलेले असतात.
बाथरूमः
आपल्याला वाटत असतं की घरातल्या बाथरुममध्ये सगळ्यात जास्त किटाणू असतात. त्यामुळे ते नित्यनियमाने आपण साफ करत असतो. पण संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की घरातल्या बाथरुममध्ये एवढे किटाणू नसतात जेवढे स्वयंपाक घरात किंवा खिडकींच्या फटीमध्ये मिळतात. याचे कारण म्हणजे या ठिकाणाची तेवढी सफाई केली जात नाही.
कीबोर्डः
तुम्हाला वाटतं की तुमचं ऑफिस हे सगळ्यात स्वच्छ ठिकाण आहे. पण तुम्हाला माहित आहे का कीबोर्डच्या दोन बटनांच्यामध्ये जी जागा असते त्यात सगळ्यात जास्त घाण साचते. त्या एका फटीमध्ये सुमारे १८,००० ते ६०,००० किटाणू असतात. आता तुम्हीच विचार करा की तुमच्या कीबोर्डवर एकूण किती किटाणू असतील ते…
पैसेः
अमेरिकेमध्ये केलेल्या एका संशोधनात बघितलं गेलं आहे की प्रत्येक डॉलरच्या नोटांवर आम्ली पदार्थांवर काही अंश सापडले. कारण काही लोक आम्ली पदार्थ घेण्यासाठी नोटांचा वापर करतात. मग ती नोट बाजारात वापरली जाते आणि ती अनेक ठिकाणी फिरून तुमच्या पाकिटात येते. यामुळेच तिथे नोटा हातात घेतल्यानंतर लगेच हात न धुता कोणतेही पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
फ्रीजः
तुम्ही कधी लक्षं दिलं आहे का की पाणी, दूध किंवा भाज्या काढण्यासाठी तुम्ही कितींदा फ्रीज उघड बंद करता ते. जेव्हा घरातले बाथरूम साफ केले जाते तेव्हा तेव्हा फ्रीज साफ केला जातो का? फ्रीजच्या कडीवर हजारो किटाणू जमा झालेले असतात.
रुग्णालयातही धोकाः
आपण रुग्णालयात एखाद्या आजारातून बरे होण्यासाठी जातो. पण रुग्णालयात नानाविध रुग्ण असतात. त्यामुळे तिथे आजाराची जास्त शक्यता असते. यामुळेच तिथे डॉक्टर आणि नर्स दिवसभर सुरक्षेची काळजी घेतात.
तांब्याच्या कड्याः
संशोधनातून हे कळलं की, तांब्यावर कोणतेही किटाणू टिकत नाहीत. यामुळे जर्मनीच्या काही दवाखान्यात तांब्याच्या कड्या लावण्यात आल्या आहेत. शिवाय आपल्याकडेही पूर्वी तांब्याच्या भांड्यांचा वापर सगळ्यात जास्त केला जायचा.
हॅलो नाही नमस्कारच चांगलाः
रुग्णालयात गेल्यास तिकडे कमीत कमी व्यक्तींशी हस्तांदोलन करा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुवायला विसरु नका. हात नियमित धुतल्याने तुम्ही त्वचा रोग, नेत्र रोग, आतड्यांचे आजार अशा अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करु शकता.