संपूर्ण काश्मीरमध्ये गुलाबी थंडीची लाट पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खो-यातील तापमानाचा पारा खाली उतरत आहे. त्यामुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. येथील तापमान इतके खाली उतरले आहे की पीर पंजाल घाटातील धबधबा देखील गोठून गेला आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

गेल्या दोन दिवसांपासून काश्मीरमध्ये थंडीची लाट आहे. अशातच मंगळवारी रात्रीपासूनच काश्मीरमधील तापमान सतत खाली उतरत आहे. गुलमर्ग सोडले तर अनेक ठिकाणचा पारा हा ऋण ३ ते दोन अंश सेल्शिअसच्याही खाली गेला आहे. ठिकठिकाणी बर्फाच्या चादर पसरल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथे जोरदार बर्फवृष्टी होते आहे. तापमानात झालेली घट आणि बर्फवृष्टी यामुळे रजौरीमधला धबधबा देखील गोठून गेला आहे. रजौरी हा भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे अनेक छोटी मोठे तलाव आहेत. परंतु दोन दिवसांपासून तापमान घटत असल्याने येथील धबधबा देखील गोठून गेला आहे.

धबधब्याचे पाणी हे वाहते असते त्यामुळे क्वचित प्रसंगी असा गोठलेला धबधबा पाहायला मिळतो. हिवाळ्यात ऋण अंश सेल्शिअसच्या खाली तापमान गेले की अनेक नद्या किंवा नाले गोठतात. पण, धबधबा गोठण्याचा प्रकार क्विचितच पाहायला मिळतो.