व्हॉट्स अॅपवर मेसेज करताना बरेचदा चुकून  मेसेज भलत्यालाच जातो. कधी कधी तर ग्रुपमध्ये तसले फोटोही सेंड होतात आणि आपली नाचक्की होते. तेव्हा मेसेज, फोटो व्हिडिओ कोणा भलत्यालाच पाठवण्याची चूक अनेकदा आपण करतो. असे तुमच्याही बाबातीत बऱ्याचवेळा घडलं असेलं. बरं  हे असं अॅप आहे जिथे आपण एकदा मेसेज सेंड केला की चूक सुधारायला देखील आपल्याला संधी मिळत नाही. पण तुमचा हा त्रास लवकरच दूर होणार आहे कारण व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे.  या फिचरमुळे जर का  तुम्ही चुकून एखाद्याला मेजेस किंवा फोटो पाठवले तर ते कँन्सल करण्याचा पर्याय तुम्हाला या फिचरमुळे मिळणार आहे.  WABetaInfo च्या माहितीनुसार या नव्या फिचरची चाचणी व्हॉट्सअॅपने केली आहे आणि लवकरात लवकर व्हॉट्सअॅप आपले ‘Recall’ हे फिचर ‘२.१७.१९०+’ व्हर्जनवर उपलब्ध करणार आहे.  या फिचरमुळे पाच मिनिटांच्या आत युजर्स चुकून पाठवलेले संदेश, फोटो, डॉक्युमेंट, व्हिडिओ डिलीट करू शकतात.