लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कित्येक महिला या जगात आहेत पण प्रत्येकीला न्याय मिळतो असं नाही. काहींना आयुष्यभर न्याय मिळवण्यासाठी झगडावं लागतं, तर याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक महिलांचे आवाज दाबूनही टाकण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रिंनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विषय किती गंभीर आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली पोलखोल, पाहा विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांच्या सामानासोबत काय करतात

अनेक महिला आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहे पण याविषयी ते खुलेपणाने बोलू शकत किंवा न्याय मागू शकत नाही. अशा महिलांनी फक्त सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून ट्विट करावं किंवा फेसबुकवर स्टेटस अपलोड करावं असं आव्हान हॉलिवूड अभिनेत्रींनी केलं आहे. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला आहे. भारतातही ट्विटवर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषदेखील मुक्तपणे हा हॅशटॅग वापरून व्यक्त होत आहेत.

लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयावर संपूर्ण जगाच लक्ष वेधण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. हार्वी वीनस्टीनवर जगभरातून टीका झाल्यानंतर ऑस्कर बोर्डवरून त्यांना हटवण्यात आलं आहे. निर्माते असलेल्या हार्वींच्या अनेक चित्रपटांना ऑस्कर मिळाला आला आहे. हार्वीचं एकूणच स्थान हॉलिवूडमध्ये मोठं असल्याने अनेक अभिनेत्री त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी घाबरत होत्या पण आता अनेकींनी पुढे येऊन तक्रारी केल्या आहेत.

मुंबई पोलिसांचा दिलदारपणा, तक्रारदाराला दिला सुखद धक्का