काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता आजही हा फोटो अनेकांच्या लक्षात असेल, गळ्यात मोठी पांढरी पाटी अडकवून एक आजोबा रोज सकाळी घराबाहेर पडायचे. आजतरी आपल्या पत्नीसाठी किडनी देणारा एखादा डोनर मिळेल अशी नेहमीच त्यांना आशा असायची. ‘माझ्या पत्नीला किडनी हवीय, मदत करा’ असा संदेश लिहिलेली पाटी गळ्यात अडकवून ते रस्त्यावर फिरायचे. साधरण २०१२ मध्ये त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. पण किडनी मिळूनही आपल्या पत्नीचे प्राण वाचवता आले नाही.

वाचा : हे कुटुंब खरोखर राहत होतं ‘काळाच्या ४० वर्ष मागे’

वाचा : रोजगार हिसकावून घेणा-या रोबोटवर टॅक्स लावला पाहिजे- बिल गेट्स

जिम्मी आणि लॅरी यांचा साठ वर्षांचा संसार होता. सुख दु:खात एकमेकांना साथ देण्याचे वचन त्यांनी घेतले होते आणि शेवटपर्यंत लॅरीने आपले वचन पाळलेही. त्यांची पत्नी जिम्मी यांची एक किडनी निकामी झाली होती. त्यामुळे पत्नीला किडनी देणा-या डोनरच्या ते शोधात होते. सकाळी उठले की रोज गळ्यात ते पांढ-या रंगाची पाटी लावून घरातून निघत. आजतरी आपल्या पत्नीला किडनी देणारे कोणी मिळेल अशी आशा त्यांना असायची. सोशल मीडियावरही अनेक फोटो व्हायरल झाले होते. एक वर्षानंतर त्यांना किडनी डोनर मिळाले यानंतर आपल्या पत्नीसोबत काही काळ आनंदात घालवता येईल असे त्यांना वाटले पण त्यांच्या संसाराला ग्रहण लागले.  गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत एकमेकांना साथ देऊ असे वचन एकमेकांना दिले होते मात्र हे पूर्ण झाले नाही  याचे दु:ख आपल्याला आयुष्यभर सलत राहिल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.