आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही एकमेकांचे सोबती राहणार अशा आणाभाका लग्नाच्या वेळी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या गेलेल्या पतीचा पुर्नजन्म झाला असून त्याने गायीच्या रुपात पुर्नजन्म घेतला असल्याचा दावा एका महिलेने केला आहे. ही महिला कंबोडिया येथील असून खिम हँग असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे या वासराशी लग्न केल्यानंतर ही महिला वासराला आपल्या शेजारी घेऊन झोपते. ही महिला ७४ वर्षांची असून पती गेल्यानंतर तीच्यापुढे दुःखाचा डोंगर उभा राहीला होता. आणि त्यावर तीने हा उपाय शोधून काढला आहे.

एकदा अचानक हे वासरु माझ्याजवळ आले आणि त्याने माझ्याशी संवाद साधला मी तुझा पती आहे असे ते म्हणाल्याचे ही महिला सांगते. इतकेच नाही तर य वासराने माझ्या जवळ येत मला चाटलेदेखील आणि मला किसही केले. त्यामुळे तो माझा पतीच आहे यावर माझा विश्वासच बसला. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ही महिलाच नाही तर तिची मुलेही या वासराला आपले वडिल मानत आहेत. हे वासरु केवळ ५ महिन्यांचे असून त्याचा अनेक सवयी आपल्या वडिलांप्रमाणे असल्याचे या सगळ्यांचे म्हणणे आहे. या वासराचे महिलेच्या मुलांशी वागणे पाहून ते त्यांचे वडिलच आहेत असे कोणीही म्हणेल. टोल खूत असे या गेलेल्या व्यक्तीचे नाव होते.

हे वासरु या कुटुंबातच राहत असून गेलेल्या व्यक्तीच्या खोलीतच असते. या खोलीच्या खिडकीतून ते बाहेर पहात राहते. हे कुटुंबही या वासराला आपल्यासोबत जेवायला, झोपायला घेते. इतकेच नाही तर टोल यांना आवडणारी त्यांची उशीही हे वासरु आवडीने घेऊन झोपते. या वासराची मी मरेपर्यंत पतीसारखीच सेवा कऱणार असल्याचे हँग सांगते तर मी गेल्यानंतरही त्याची तुम्ही काळजी घ्या असे ती आपल्या मुलांना बजावते. गावातील अनेक जण या घरात हे वासरु येत असून ते कुटुंबासोबत कशापद्धतीने राहते ते पहायला येत आहेत.