मृत्यूच्या दाढेतून सुटका काय असतं हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पाहा. मृत्यू काही फूटांच्या अंतरावर असताना त्याला चकवा देत एक महिलेनं मृत्यूच्या जबड्यातून आपली सुटका करून घेतली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिला तर काही सेकंदासाठी कोण्याच्याही काळजाचा ठोका चुकेल.

दक्षिण चीनमधल्या नदीवरचा हा व्हिडिओ आहे. पूरामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. या नदीवर लाकडी पूल होता. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे लाकडी पूर पुरता मोडकळीस आला होता. आणि नेमकी याच पुलावर एक महिला अडकली होती. तिला पूल पार करून पलिकडे जायचं होतं. पण प्रवाहाच्या वेगामुळे पूलही तितक्याच वेगानं ढासळत चालला होता. पण तरीही ही महिला घाबरली नाही तिनं, मृत्यूच्या मगर मीठीतून स्वत:ची सुटका करून घेतली. ती पलिकडे सुखरूप पोहोचली आणि काही सेकंदातच पत्त्याच्या बंगल्यासारखा पूर कोसळला. तिच्या सुटकेचा थरार दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल हे नक्की!