एखाद्या नियम मोडला आणि नेमके पोलिसांच्या तावडीत सापडलो की आपल्या भारतीयांचा एक टिपिकल आणि ठरलेला डायलॉग बाहेर येतो तो म्हणजे ‘ तू जानता नही मै कौन हू?” वगैरे वगैरे. त्यामुळे आजकाल कोणालाही जिथे तिथे हे घिसेपीटे डॉयलॉग चिटकवण्याची जणू सवयच झाली आहे. आता यात ही महिला तरी कशी मागे राहिल बरं. या महिलेला नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करायची होती. पण अडचण अशी होती की पोलीस काही गाडी पार्क करू देईना, वरून गाडी पार्क करण्यासाठी तो लाज मागत होता( असं तरी या महिलेचं म्हणणं होतं.) त्यामुळे या लाजखोर पोलिसाला महिलेने आपल्या भाषेत धडा शिकवला.

अर्थात सुरूवातीला ‘ए तूला माहित नाही मी कोण आहे?’ या टिपिकल डॉयलॉगचं शस्त्र उपसून तिने भांडायला सुरूवात केली. ( तिची  मुलगी म्हणजे हार्यकोर्टात न्यायधीश आहे.) तेव्हा तूला चांगली अद्दल घडवू याची धमकी तिने पोलिसांना दिली. वरून पैसे खाण्यासाठी तो दिल्ली पोलिसात भरती झाला आहे हेही ऐकवायला ती विसरली नाही. या सगळ्या भांडणात त्या पोलिसाची लायकी वगैरे काढून त्याचा उद्धार केला तो वेगळाच. या व्हिडिओमध्ये काही लोक पार्किंग फूल असल्याचे तिला सांगत होते पण तिने मात्र वाद घालण्याचा पवित्राच घेतला.

Can you feed ducks bread
तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?
Madhya pradesh beggar who faked disability in bhopal beaten by old man
Fake Beggars: पैशांसाठी अपंग असल्याचे नाटक; तोतया भिकाऱ्याला वृद्धाने दिला चोप; VIDEO होतोय व्हायरल
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?
What happen if color is applied on the uniform of a policeman?
होळीच्या बंदोबस्तावेळी पोलिसांच्या वर्दीला रंग लागला तर काय? आपण पोलिसांना रंग लावू शकतो का? जाणून घ्या

No Musker Tusker या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात या महिलेने पोलिसांशी नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करून न दिल्याने त्याच्याशी असभ्य भाषेत वर्तन केले तसेच १०० नंबर डाएल करून तो लाच घेतो असेही सांगितल्याचे म्हटले आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार फक्त नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करू न दिल्याने महिला भडकल्याचे म्हटले, आता नेमकं खरं काय आणि खोट काय हे माहित नाही पण सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.