मोरोक्कोमध्ये चालत्या बसमध्ये काही अल्पवयीन मुलांच्या घोळक्यानं प्रवाशी महिलेचा विनयभंग केला. वयाचं कोणतंही भान न ठेवता ही मुलं इतर प्रवाशांसमोर तिचा विनयभंग करत होते. पीडित महिला मदतीसाठी याचना करत होती, पण प्रवासीच काय पण बसचा चालक देखील या महिलेच्या मदतीला आला नाही. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर या मुलांना अटक करण्यात आली.

ही सर्व १५ ते १७ वयोगटातली मुलं आहेत. महिला बसमध्ये चढल्यानंतर सुरुवातीला या मुलांनी तिच्यावर अश्लिल विनोद करायला सुरूवात केली, त्यानंतर तिचे कपडेही या मुलांनी फाडण्याचा प्रयत्न केला. पीडितीने हा सारा प्रकार सुरू असताना मदतही मागीतली, ती रडत मदतीसाठी गयावया करत होती पण एकही प्रवासी तिच्या मदतीला आला नाही. बसमध्ये घडलेल्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येथे अर्ध्याहून अधिक महिलांना घरगुती हिंसा किंवा छेडछाड, विनयभंगाला सामोर जावं लागतं. बसमधले हे व्हिडिओ व्हायरल झाले पण अनेकांनी या महिलेची बाजू घेण्यापेक्षा तिच्या कपड्यांमुळे तिच्यावर अशी वेळ आली असं सांगत तिला दोषी ठरवलं आहे.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद