नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफीकेशन नंबर’ अर्थात आधार कार्डमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीत व्हावेत, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. आता आधारकार्ड क्रमांक हा आयकर भरण्यासाठी तसेच पॅनकार्डसाठी नोंदणी करतानाही आवश्यक असतो. आधारकार्डवर आता नागरिकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीही असणार आहे.

आपल्या आधारकार्डावरील मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ऑनलाईन पद्धतीने पडताळून पाहता येणार आहे. नागरिकांना ‘युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवरुन या गोष्टी तपासता येणार आहेत. या वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यावर व्हेरिफाय ई-मेल अॅंड मोबाईल नंबर असा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला आधारकार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूच्या बॉक्समध्ये असलेला सिक्युरिटी कोड याठिकाणी टाकायचा आहे. जर ही माहिती अपडेट केलेली नसेल तर तुम्हाला ती अपडेट करता येणार आहे.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट वन टाईम पासवर्ड (OTP) असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. हा पासवर्ड तुम्हाला मेलवर किंवा मोबाईलवर येईल. हा ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर त्याखाली व्हेरीफाय ओटीपी असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुम्हाला लगेचच तुमचा ईमेल आयडी तुमच्या माहितीशी जुळत आहे, असा मेसेज येईल. अशाचप्रकारे तुमचा मोबाईल क्रमांकही योग्य आहे का नाही ते तुम्हाला तपासून पाहता येणार आहे.