आपल्याकडे अनेक कॅफे आहेत जिथे तुम्ही कॉफी आणि इतर पदार्थ खरेदी केल्यावर त्या कॅफेत हवा तेवढा वेळ घालवू शकता. तेथील वायफाय सारख्या सुविधांचा मोफत लाभ घेऊ शकता. पण एक कॅफे यापेक्षाही थोडा उलट आहे. जिफरब्लाट या कॅफेमध्ये ग्राहकांना खाण्यापिण्याऐवजी कॅफेत वेळ घालवण्यासाठी पैसे मोजावे लागतात. २०११ च्या आसपास सुरू झालेल्या जिफरब्लाटच्या अनेक शाखा परदेशात आहेत. या कॅफेमध्ये येणा-या प्रत्येक माणसाला कॅफेत व्यतित करणा-या प्रत्येक मिनिटांचे पैसे मोजावे लागतात, त्याबदल्यात ते या कॅफेमध्ये हवे तेवढे खाऊ शकतात तसेच येथील हायस्पीड वायफायचादेखील लाभ घेऊ शकतात. प्रत्येक ग्राहकाला या कॅफेत आल्यानंतर आपल्या प्रवेशाची नोंद करण्याबरोबरच एक ठाराविक रक्कमही भरावी लागते. त्यानंतर मात्र प्रत्येक मिनिटांसाठी त्यांना ६ पाउंड भरावे लागतात. सुरुवातील रशियामध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. आता लंडन, युक्रेन यासारख्या देशांत याच्या शाखा आहे. या संकल्पनेची सोशल मीडियावर जास्तच चर्चा होत आहे.