तर मुलांनो, आपल्या देशामध्ये एके काळी एक खूप मोठे संत होऊन गेले. त्यांनी म्हटले होते, की महापुरे झाडे जाती, तेथे..? बरोब्बर, लव्हाळे वाचती. याचा अर्थ काय? तू सांग बरे.. अरे काहीही काय? मेट्रोचा आणि याचा काय संबंध? महापुरात काय झाडे तोडतात काय? ती वाहून जातात. पण लव्हाळे वाचतात. आता लव्हाळे का वाचतात?.. गाढवा! तसा कोर्टाचा आदेश असतो असे कोणी सांगितले तुला? लव्हाळे म्हणजे काय खारफुटी आहे? अरे शुंभांनो, लव्हाळे वाचती म्हणजे काय, तर उगाच छाती काढून चालू नये. उद्धटपणा, आगाऊपणा करू नये. माणसाने नेहमी नम्र असावे. म्हणजे कोणत्याही संकटात तो तगून जातो. आता हेच पाहा. आपले आधीचे हेडमास्तर. कसा ताठपणा करायचे? पण गेले की नाही बदली होऊन? उडविले की नाही आपण त्यांना नम्रपणाने? तेव्हा आयुष्यात माणसाने कसे विनम्र असले पाहिजे. कसे असले पाहिजे? विनम्र! तेव्हा आता आपण काय करायचे, तर सतत नम्रपणे वागायचे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी शंभर वेळा नमस्कार करायचा.. मूर्खा, मनातल्या मनात नाही. प्रत्यक्ष. असा. हात जोडून.. कुणाला म्हणजे? जे जे मोठे असतील त्या सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर आईला नमस्कार करायचा.. का? तू का नाही करणार आईला नमस्कार? तिला नमस्कार केलाच पाहिजे. काही नाही तुला वेड लागलंय म्हणणार ती. अरे नमस्कारातूनच माणसे मोठी होतात. आज तुम्हाला असा येता-जाता नमस्कार घालायची सवय लागली ना, तर बघा, मोठेपणी तुम्ही किती मोठे व्हाल. काही नाही, तर राजकारणात तर नक्कीच जाल. तेथे पाहा सगळे एकमेकांचा किती आदर करीत असतात. निवडणुकीच्या काळात तर ते लहान लहान मुलांनासुद्धा नमस्कार करतात. किती विनम्र असतात तेव्हा ते. ती विनम्रता, ती आदरभावना आपल्या अंगी यायला हवी की नको बाळांनो? तेव्हा आता आपण आजपासूनच सहस्र नमस्कार योजना सुरू करायची आणि सोलापूर जिल्हा शिक्षण मंडळाला दाखवून द्यायचे की आपली शाळा किती विनम्र आहे ते. मग प्रत्येकाने आता काय करायचे? एक वही ठेवायची जवळ. कोणी मोठे दिसले, की लगेच नमस्कार करायचा.. सूर्यनमस्कार नाही रे.. त्याला वेळ लागतो. आपण नुसतेच हात जोडायचे. आणि जोरात म्हणायचे, एकसाथ नमस्कार! एक नमस्कार केला, की लगेच तो वहीत नोंदवायचा. रोज ती वही तपासायला द्यायची. शंभर नमस्कार झालेच पाहिजेत रोज. एक जरी कमी भरला ना, तर बघा.. रात्रभर नमस्कार घालायचा गृहपाठ करावा लागेल.. कोण, कोण म्हणाले ते.. कोण म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅपवर शंभर नमस्कार फॉरवर्ड केले तर चालतील का?.. पण खरेच, काय हरकत आहे? हवे तर डिजिटल विनम्रता म्हणता येईल त्याला..

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Case of denial of soldiers allowance to family members No decision on martyrs wifes demand due to Lok Sabha elections
कुटुंबीयांना सैनिक भत्ता नाकारण्याचे प्रकरण : लोकसभा निवडणुकांमुळे शहीद पत्नीच्या मागणीवर निर्णय नाही
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम