विनयभंग केल्याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने गायक यश वडाली यांच्याविरोधात गोरेगाव येथील बंगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी बुधवारी यश विरोधात गुन्ह्याची नोंद केली. सध्या या प्रकरणी तपास सुरु असून, त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.

वाचा : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयात हजर राहणार सलमान खान

गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेच्या एका मित्राच्या घरी यश आणि इतर काही लोक पार्टीसाठी जमले होते. त्यावेळी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाणं म्हणण्यावरून यश आणि त्या महिलेत वाद झाला. नंतर यशने तिची कॉलर पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तिला शिवीगाळही केली.

वाचा : सुनील पालच्या आरोपांनंतर भडकले ‘मुबारका’चे दिग्दर्शक अनीस बाज्मी

महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यश विरोधात कलम ३५४ (लैंगिक शोषण), ५०४ (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या यशला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत असून, पुराव्यांच्या निष्कर्षावर पुढील पाऊल उचलण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक म्हणाले. यश वडालीला आज दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.