रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून यंदाही विवेकानंद रुग्णालयातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत फिरते रुग्णसेवा केंद्र वारकऱ्यांच्या सेवेसाठी रवाना झाले.
डॉ. मंगेश वळसंगकर, डॉ. बाजीराव जाधव हे वैद्यकीय अधिकारी, परिचारक दगडू जाधव, गणेश गणापुरे, शिवकुमार मेदगे व चालक राजकुमार ठाकूर, सोपान गवंडगावे यांचे हे पथक दररोज किमान अडीच हजार रुग्णांना पुरेल, एवढे साहित्य घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले. सोमनाथ बालवाड यांच्याकडे पथकाचे नेतृत्व आहे.
विवेकानंद रुग्णालयाच्या डॉ. महेश देवधर, अनिल अंधोरीकर यांच्या दूरदृष्टीतून डॉ. अशोक कुकडे व डॉ. भराडिया यांच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रुग्णसेवा आषाढी एकादशीपर्यंत सुरू असेल. पथकाला शुभेच्छा देण्यासाठी शशिकांत पाटील, डॉ. दिलीप देशपांडे, डॉ. महेश देवधर, डॉ. अरुणा देवधर, लक्ष्मीकांत कर्वा, डॉ. अभय ढगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधेश्याम कुलकर्णी, डॉ. सतीश मणियार, डॉ. मीरा नागावकर, जनसंपर्क अधिकारी विनोद खरे, महेश अंबुलगे, अजय कुलकर्णी, श्रीनिवास नक्का, अनिल जवळेकर, राजकुमार ढगे आदी उपस्थित होते.