फिजिओथेरपी संबंधित शिक्षणक्रमांची आणि त्यातील वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमाची सविस्तर ओळख
रुग्णाच्या शारीरिक हालचाली पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपिस्टचे सहकार्य घेतले जाते. फिजिओथेरपिस्ट विविध प्रकारचे व्यायाम प्रकार शिकवण्यासोबत रुग्णांच्या शारीरिक वेदना कमी करणे अथवा पूर्णपणे संपुष्टात आणणे, शारीरिक व्यंग असलेल्यांना सुव्यवस्थित हालचाली करण्यासाठी साहाय्य करणे या दृष्टीने कार्यरत असतात. फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट या नावाने ओळखला जातो. बहुतेक सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असतो. बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणी द्यावी लागते. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते.
करिअर संधी
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर थेट करिअर करणे शक्य असते. रुग्णांची तपासणी, शारीरिक अवस्थेचे शास्त्रीय निरीक्षण त्याचे वैद्यकीयदृष्टय़ा विश्लेषण, शारीरिक व्यंगावर उपचार, कार्यात्मक मर्यादेवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यास पदवीधर फिजिओथेरपिस्ट सक्षम समजला जातो. पदवी प्राप्त केल्यानंतर फिजिओथेरपिस्ट स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करू शकतात. याशिवाय विविध शासकीय आणि खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्र्रे, कॉर्पोरेट रुग्णालये, शुश्रूषागृहे, कॉर्पोरेट हाऊसेस, क्रीडा प्राधिकरणे, वृद्धाश्रम, अपंग शाळा यामध्ये कामाची संधी उपलब्ध होऊ शकते. व्हेटरनरी फिजिओथेरपी ही नवी शाखा आता उदयाला आली आहे.
पदव्युत्तर पदवी प्राप्त करून स्पेशलाइज्ड फिजिओथेरपिस्ट होता येते. पदव्युत्तर पदवी अभ्यसक्रमालासुद्धा प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर पदवीधारक फिजिओथेरपिस्ट अध्यापन- संशोधनामध्ये करिअर करू शकतात. त्यांच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्राला अनुसरून त्या पद्धतीच्या रुग्णांवर उपचार करू शकतात. अशी स्पेशलाइज्ड फिजिओथेरपिस्ट सेवा मोठय़ा प्रमाणावर रुग्णालयांकडून घेतली जाऊ शकते.
 अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था
* कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस :
या कराडस्थित अभिमत विद्यापीठाच्या संस्थेत बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाला कृष्णा अखिल भारतीय प्रवेशचाचणीद्वारे प्रवेश दिला जातो.
पत्ता- कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सटिी, कराड. वेबसाइट-  http://www.kimsuniversity.in
ईमेल- contact@kimsuniversity.in
* प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस :
संस्थेने बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि मास्टर ऑफ फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमासाठी देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी घेण्यात येते. ही परीक्षा नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात येते. मास्टर ऑफ फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांतर्गत ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी, न्युरो फिजिओथेरपी, काíडओरेस्पिटरी फिजिओथेरपी, कम्युनिटी फिजिओथेरपी, पेडिअ‍ॅट्रिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहितीपत्रक http://www.pravara.comया वेबसाइटवर ठेवण्यात येते. पत्ता- प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी- ४१३७३६, तालुका रहाटा, जिल्हा अहमदनगर.
ईमेल-  pimscet@pmtpims.org
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश
असो. सीईटी असोशिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड  प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड  कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संस्थेमार्फत राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मेडिकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट- असो. सीईटी घेण्यात येते. या परीक्षेद्वारेच २० फिजिओथेरपी महाविद्यालयांतील ६७० जागा भरण्यात येतात. ही परीक्षा मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये घेतली जाते.  पत्ता- असोशिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, एएमयूपीएमडीसी ऑफिस, २६८/७०, चंद्रेश भुवन, तळमजला, रूम नंबर-९, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट,
मुंबई- ४००००१ वेबसाइट- http://www.amupmdc.org
ईमेल- contact@amupmdc.org
* श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट :
श्री रामचंद्र युनिव्हर्सिटि अंतर्गत कार्यरत असणाऱ्या श्री रामचंद्र कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम करता येतो. या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. या संस्थेने मास्टर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम ऑर्थोपेडिक अ‍ॅण्ड ट्राऊमॅटोलॉजी, न्युरो सायन्स आणि काíडओ पल्मोनरी सायन्स या विषयांमध्ये सुरू केला आहे. पत्ता- श्री रामचंद्र युनिव्हर्सिटि, पोरुर, चेन्नई- ६००११६. वेबसाइट- http://www.sriramchandra.edu.in
* सुमनदीप विद्यापीठ :
सुमनदीप  विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी घेण्यात येते. त्याद्वारे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी  (के. जे. पंडया कॉलेज ऑफ फिजिओथेरपी) या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. ही परीक्षा  ३१ मे २०१४ रोजी नवी दिल्ली, मुंबई, पिपारिया, वडोदरा, इंदोर, जयपूर, बंगळुरू या केंद्रांवर घेण्यात येईल. अर्ज व माहितीपत्रक http://www.sumandeepuniversity.co.inया वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. पत्ता- सुमनदीप विद्यापीठ, पोस्ट पिपारिया, तालुका वाघोडिया, जिल्हा वडोदरा- ३९१७६०.
* महर्षी मरकडेश्वर युनिव्हिर्सिटि :
> बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
> मास्टर ऑफ फिजिओथेरपी.
* पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम :
> ऑर्थो- फिजिओथेरपी
> न्युरो -फिजिओथेरपी
> काíडओ- फिजिओथेरपी
> स्पोर्टस् फिजिओथेरपी
> पेडिअ‍ॅट्रिक फिजिओथेरपी असे स्पेशलायझेशनचे विषय उपलब्ध आहेत. अर्ज संस्थेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. महर्षी मरकडेश्वर युनिव्हर्सिटि, मुल्लाना, अंबाला- १३३२०३.
वेबसाइट-  http://www.mmumullana.org
    ई-मेल-  info@mmumullana.org
* केएलई युनिव्हर्सिटि- या संस्थेने बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि मास्टर ऑफ फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संस्थेच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपी, बेळगाव येथे हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
* मास्टर ऑफ फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांतर्गत-
> ऑर्थोपेडिक म्यॅन्युअल- फिजिओथेरपी
> न्युरोलॉजी- फिजिओथेरपी
> काíडओ- फिजिओथेरपी
> स्पोर्टस्- फिजिओथेरपी
> पेडिअ‍ॅट्रिक फिजिओथेरपी
> ऑर्थोपेडिक- फिजिओथेरपी
> कम्युनिटी फिजिओथेरपी
> जेरिअ‍ॅरिट्रिक फिजिओथेरपी असे स्पेशलायझेशनचे विषय उपलब्ध आहेत.
http://www.kleuniversity.edu.in   या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरता येतो. पत्ता- केएलई युनिव्हर्सटिी, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगाव-५९००१० कर्नाटक.
ईमेल- info@kleuniversity.edu.i किंवा ‘kpit@india.com
* सविता युनिव्हर्सटिी :
> बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
> मास्टर ऑफ फिजिओथेरपी.
मास्टर ऑफ फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांतर्गत हँड फिजिओथेरपी, पेडिअ‍ॅट्रिक फिजिओथेरपी, स्पोर्ट्स- फिजिओथेरपी अ‍ॅण्ड म्यॅन्युअल फिजिओथेरपी, काíडओ रेस्पिटरी फिजिओथेरपी, न्युरो फिजिओथेरपी, आर्थोपेडिक फिजिओथेरपी असे स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. पत्ता- १६२, पूनामल्ले हाय रोड, चेन्नई- ६०००७७.
वेबसाइट-www.saveetha.com  
ईमेल- admission@saveetha.com

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
ग्रामविकासाची कहाणी
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण