मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन)- एखाद्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या भौगोलिक मतदारसंघाची सीमा मर्यादित वा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना होय. मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी मतदारसंघ पुनर्रचना आयोगावर असते. भारतामध्ये आतापर्यंत चार वेळा मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आले. (१९५२, १९६३, १९७२, २००२) पुनर्रचना आयोगाने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येत नाही.
चौथा पुनर्रचना आयोग- ८४व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील सदस्यसंख्या २०२६पर्यंत गोठविण्यात आली. ८७व्या घटनादुरुस्तीने २००१सालच्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे निर्धारित करण्यात आले. २००२ साली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौथा परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला.
निवडणूक सुधारणा- निवडणुकीत होत असलेले गरप्रकार व स्वातंत्र्यानंतर बदललेली परिस्थिती, त्यामुळे वेळोवेळी निवडणूक सुधारणांचा विषय चर्चिला गेला. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणल्याशिवाय राज्यघटनेत निकोपपणा आणता येणार नाही हे ओळखून निवडणूक आयोगाने वेळोवेळी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणली.
टी. एन. शेषन यांची कामगिरी- निवडणूक यंत्रणेत खऱ्या अर्थाने सुधारणा घडविण्याचे श्रेय टी. एन. शेषन यांना द्यावे लागेल. निर्वाचन आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे. निवडणूक आयोगाला सरकारच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणापासून मुक्त ठेवण्याची व्यवस्था तसेच तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देण्याचे श्रेय टी. एन. शेषन यांनाच द्यावे लागेल. शेषन यांच्या कार्यामुळे एक वेगळाच दरारा निर्माण झाला. टी. एन. शेषन यांनी खालील गोष्टींवर भर दिला. १) ओळखपत्र देण्याची व्यवस्था, २) आदर्श आचारसंहिता, ३) निवडणूक खर्चाचा हिशोब ४) निवडणुका जाहीर झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यावर बंधने ५) निवडणुकीत धर्माच्या आधारावर प्रचार करण्यास विरोध ६) निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी खासगी व सार्वजनिक भिंतीवरील घोषणा व चिन्हे पुसून टाकण्याचे आदेश ७) निवडणूक प्रचारासाठी ध्वनिक्षेपकांच्या वापरावर नियंत्रण.
यानंतरच्या काळात १९९६ नंतर निवडणुकीत काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर २९ फेब्रुवारी २००४ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी मार्गदíशका लागू केली. लोकसभेमध्ये महिलांचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या प्रतिनिधित्वात वाढ करण्यात यावी व राजकीय पक्षांनी दरवर्षी त्यांचा हिशोब प्रकाशित करावा यांचा त्यामध्ये अंतर्भाव होता. याव्यतिरिक्त आत्तापर्यंत करण्यात आलेल्या निवडणुकांविषयी महत्त्वाच्या सुधारणा पुढीलपकी सांगता येतील.
१) मतदानाच्या हक्कांसाठी किमान वयोमर्यादा खाली आणणे१९८८ च्या ६१व्या घटनादुरुस्तीनुसार वयोमर्यादा ही २१ वरून १८ वर्षे करण्यात
आली, यामुळे राजकारणात तरुणांचे महत्त्व वाढले.
२) मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकाराविरुद्ध कारवाई- जबरदस्तीने एखादे केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार घडला, तर निर्वाचन आयोग त्या केंद्रावरील
मतदार प्रक्रिया रद्द ठरवून फेरमतदानाचा आदेश देऊ शकतो.
३) मतदारांवर वेगवेगळय़ा मार्गानी दहशत पसरविण्याच्या प्रयत्नांवर बंदी घालण्यासाठी एक उपाय म्हणून मतदान केंद्रावर शस्त्र घेऊन जाण्यास बंदी
घालण्यात आली आहे.
४) शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने
व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.
५) निवडणूक ओळखपत्र- देशातील सर्व मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्याची केलेली व्यवस्था ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची सुधारणा म्हणता
येईल, यामुळे बोगस मतदानाला पायबंद घालणे शक्य झाले आहे. कोणत्याही व्यक्तीस दुसऱ्याच्या नावावर खोटे मतदान करणे त्यामुळे अशक्य झाले.
६) मादक पदार्थाच्या विक्रीवर बंदी- ज्या मतदारसंघात मतदान होणार असेल त्या मतदारसंघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास दारू किंवा अन्य
मादक पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीला ६ महिने कारावासाची अथवा २ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली जाऊ
शकते.
७) आचारसंहिता- निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन
करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते.
८) उमेदवारास प्रतिज्ञापत्रक बंधनकारक- लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रकात प्रत्येक उमेदवाराने आपल्या संपत्तीचा किंवा मालमत्तेचा तपशील देणे आवश्यक असते. उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल असल्यास त्यासंबंधी तपशील देणे आवश्यक आहे.
९) दोनहून अधिक मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास प्रतिबंध- पूर्वी एखादी व्यक्ती लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकींच्या वेळी कितीही मतदारसंघांतून नामांकनपत्र दाखल करत असे, परंतु आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार एका व्यक्तीला एका वेळी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जास्तीत जास्त २ मतदारसंघांतून निवडणूक लढविता येते.
अपेक्षित सुधारणा- १) संसद आणि राज्य विधिमंडळात किमान १/३ स्त्रियांना सहभाग देण्यास तरतूद करावी. २) गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्यांना अपात्र ठरविले जावे. ३) निवडणुकींचा खर्च सरकारने करावा.

यूपीएससी : जैवतंत्रज्ञान (भाग २)
ऊती संवर्धन- सजीवांची शरीराबाहेर पोषक माध्यमात वाढ करणे म्हणजे ऊती संवर्धन होय. ऊती संवर्धन हे दोन प्रकारे केले जाते.
अ) इन व्ह्रिटो (In Vitro) ऊती संवर्धन- या प्रकारचे ऊती संवर्धन प्रयोगशाळेत परीक्षानळीत विशिष्ट पोषण द्रावणात केले जाते. सामान्य वातावरणात राहावे यासाठी आवश्यक रासायनिक घटक यात असतात. ब) इन व्हिओ ((In vivo) ऊती संवर्धन- या प्रकारात योग्य ते बदल  घडवून आणलेल्या ऊती सजीवांच्या शरीरात वाढवल्या जातात. वैद्यकीय संशोधनासाठी ही पद्धत जास्त वापरली जाते. याच प्रकारे केवळ पेशीदेखील स्वतंत्रपणे माध्यमात वाढवता येऊ शकतात.
ऊती/पेशी संवर्धन पुढील क्षेत्रात वापरले जाऊ शकते१)
विषाणूजन्य रोगांवरील लसी तयार करण्यासाठी उदा. पोलिओ लस.
२) अर्भकात काही जनुकीय विकृती आहेत का हे शोधण्यासाठी (ाी३४२) मधील पेशींचे संवर्धन केले जाते.
३) गंभीर रीतीने भाजलेल्या रुग्णांसाठी स्किन ग्राकफ्टग म्हणजे त्वचारोपण केले जाते. त्यासाठीही हे तंत्र वापरतात.
४) वनस्पतींचे क्लोनिंग करण्यासाठीही ही पद्धत वापरतात.
पशुसंवर्धन- कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन जैवतंत्र पद्धती पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. त्यांच्या साहाय्याने दूध, मांस, ओढकाम इ.चे जास्त उत्पादन देणाऱ्या प्राण्यांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. तसेच क्लोनिंगचा वापर पशुसंवर्धन क्षेत्रात शक्य आहे. एका प्राण्यापासून हुबेहूब सारखे गुणधर्म असणारा व अलैंगिक पद्धतीने निर्माण केलेला प्राणी तयार करणे याला क्लोनिंग प्रक्रिया म्हणतात. अशा प्रक्रियेने तयार केलेल्या नवीन जीवाला क्लोन असे म्हणतात.
जर्मन शास्त्रज्ञ इयान विल्मुट यांनी डॉली नावाच्या मेंढीचे क्लोनिंग केले.यानंतर डॉलीने नैसर्गिक रीतीने दुसऱ्या मेंढीस जन्मही दिला. क्लोनिंगसंदर्भात
नतिकतेचा मुद्दा जरी विशेषत्वाने उपस्थित केला जात असला तरी वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे.
मानवी आरोग्य अ) लसी तयार करण्यासाठी नेहमीच्या लसीकरण पद्धतीमध्ये रोगनिदान करणारे जिवाणू किंवा विषाणू यांचा वापर केला जातो. हे जिवाणू अर्धमेल्या अवस्थेत शरीरात टोचले जातात. त्यामुळे शरीराकडून त्यांना प्रतिकार करण्यासाठी प्रतिकार प्रथिने तयार केली जातात व पुन्हा जेव्हा आयुष्यामध्ये या रोगाचे विषाणू आपल्या शरीरात शिरतील तेव्हा शरीराकडून अशा प्रकारची प्रतिकारक प्रथिने तयार केली जातात. मात्र या पद्धतीत एक दोष आहे. जर काही वेळा अर्धमेले जिवाणू पुन्हा कार्यरत होऊन तो रोग घडवून आणू शकतात, मात्र आता जनुकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून या जिवाणू किंवा विषाणू यांच्या जनुकीय गुणधर्मामध्ये बदल घडवून आणता येतो. तसेच त्यांना रोगप्रतिकारक अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी भाग पाडले जाते म्हणून सध्या अर्धमेले किंवा मृत जिवाणू / विषाणू शरीरात न टोचता हे अँटीबॉडीज शुद्ध स्वरूपात शरीरात टोचले जातात. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक परिणामकारक असतात व त्यांची क्षमतादेखील अधिक काळासाठी टिकून राहते. उदा. पोलिओ, हिपॅटायटिस बी लस इ.
खाद्य लसी- जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खाद्यपदार्थामध्ये किंवा फळांमध्ये रोगकारक जिवाणूंच्या विरुद्ध काम करणारी प्रथिने निर्माण करून त्याचा वापर खाद्य लसीसारखा करता येतो. उदा. जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे बटाटे निर्माण केले जातात, की ज्यामध्ये (इ-कोली) यांसारख्या जिवाणूंच्या विरुद्ध प्रथिने तयार करण्याचे तत्त्व आहे. असे बटाटे खाल्ल्यास इ-कोली जिवाणूंमुळे होणाऱ्या रोगांपासून आपोआप शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. याच प्रकारचा प्रयोग केळी, टोमॅटो या फळांमध्येदेखील केला जातो.
जीन थेरपी (Gene Therapy)- आनुवंशिक रोगांवर औषधांचा फारसा उपयोग होत नाही, त्या व्यक्तींमध्ये काही जनुके काम करत नाहीत.  त्यामुळे अशा व्यक्तींना आनुवंशिक रोगांना सामोरे जावे लागते. उदा. सीकल सेल अ‍ॅनिमिया, थॅलॅसिमिया, रक्ताचे विविध आजार. अशा व्यक्तींमध्ये निरोगी किंवा पूर्णत: काम करणारी विशिष्ट जनुके घालून शारीरिक अथवा चयापचयक्रिया निरोगी सामान्य व्यक्तीप्रमाणे सुरळीत चालवून, आनुवंशिक रोग नियंत्रणात आणता येतो. ही उपाययोजना करण्यासाठीचे विविध प्रयोग चालू असून कर्करोग, एड्स, हृदयविकार, चयापचयाचे आनुवंशिक रोगप्रकार यावर जीन थेरपी उपयोगी पडू शकते.
मूलपेशी संशोधन (Stem Cell) स्टेम सेलचा वापर मधुमेह, हृदयरोग, अल्झायमर रोग यामुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी होऊ शकतो. हृदयाच्या पेशी तसेच मेंदूच्या पेशी एकदा नष्ट झाल्यानंतर त्या पुन्हा तयार होत नाहीत. याशिवाय अ‍ॅनिमिया, ग्लुकोमिया, थॅलॅसिमिया इ. रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनविण्यासाठी तसेच भविष्यकाळात स्टेम सेलपासून अवयव तयार करून त्यांचे रोपण तयार करणे शक्य होणार आहे.
निदान शास्त्र- जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून रोगांमधील जनुकांची भूमिका आधीच निश्चित करण्याची तसेच त्याबाबत रोग होण्याच्या आधीच माहिती मिळविणे शक्य झाले आहे म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून मधुमेह आणि हृदयरोग यांची लक्षणे दिसण्याआधीच या रोगांचे निदान करणे शक्य होणार आहे, तसेच जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पी.सी.आर. तंत्रज्ञानाचा वापर करून विषाणूजन्य रोगांचे निदान होणे शक्य झाले आहे. पी.सी.आर. तंत्रज्ञानामुळे कॅन्सरचे निदान होणे शक्य झाले आहे. तसेच इलिसा किंवा वेस्टर्न ब्लॉट या तंत्रज्ञानामुळे एड्स या रोगाचे निदान करणे शक्य झाले आहे.

Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
maharashtra, Communist Party of India Marxist, lok sabha election 2024, constituency
मार्क्सवाद्यांमध्ये मतदारसंघाच्या निवडीवरून धुसफूस
Vidarbha, Lok Sabha 2024, Constituency, fight Uncertain, political parties, Delay Announcements, Campaigns, Post Holi, mahayuti, maha vikas aghadi, maharashtra politics, candidates,
धुळवडीनंतरच प्रचारात रंग भरणार; अनेक मतदारसंघातील लढतीचे चित्र अस्पष्ट