कळव्यातील पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य संघवी व्हॅलीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका शानदार सोहळ्यात ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील भाग्यवान विजेत्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. संघवी समूहाचे राकेश संघवी, पाश्र्व डेव्हलपर्सचे विक्रम पारेख, सुरभि अ‍ॅडव्हर्टायझिंगचे व्ही. यू. नायर, लोकसत्ता विपणन विभागाचे सुब्रतो घोष आदी या प्रसंगी उपस्थित होते. ‘बे दुणे दहा’ फेम सोनाली खरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या या उपक्रमाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून या उपक्रमास दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. शनिवारच्या सोहळ्यात ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यानच्या सोडतीतील सुहास दिवाण, माधुरी चौधरी, सागर भाणसे, अप्पी सुवर्णा, अश्विनी हजरनीस, गौरव अचरेकर, अनुजा धारप, सुनीता काळे, स्मिता मनोहर, प्रसाद चाफेकर, संतोष माने, दीपिका परदेशी, विनोदिनी देशमुख, स्वाती ठाकूर, मृणाल प्रधान, रीना कदम, नीला कासखेडीकर, विवेका तांबडे, आणि अनिता कदम या भाग्यवंत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सोनाली खरे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

पारितोषकांची  लयलूट
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या ठाणे-डोंबिवली आणि कल्याण या शहरांमधील ७५हून अधिक दुकानांमध्ये खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी भाग्यवान विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणेतर्फे  पैठणी साडी, पॅपिलॉन-ठाणेकडून मोबाइल संच, कलानिधी-ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्डकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे एका भाग्यवान ग्राहकास संघवी समूहाकडून कार आणि  पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूर सहल पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.  

खरेदी करा आणि जिंका..
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणारे भाग्यवान ग्राहक बक्षिसांचे विजेते ठरत आहेत. खरेदीचे बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ताह्णच्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया
न मागे तयाची रमा होई दासी
मी कधीही लॉटरीचे तिकीट काढले नाही. ‘त्या’ दिवशीही ‘अ‍ॅटवन्स’मध्ये बेडशीटस् खरेदी करताना भाग्यवान सोडतीचा विचारही मनात नव्हता. आम्ही लोकसत्ता मात्र नियमितपणे वाचतो. त्यामुळे शॉपिंग फेस्टिव्हलचे कुपन्स भरून ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते. सुवर्णमुद्रा पारितोषिक म्हणून मिळाल्याचे कळताच खूप आनंद झाला. कारण हे मला मिळालेले पहिले पारितोषिक आहे. ‘न मागे तयाची रमा होई दासी’ याचा प्रत्यय आला.
-नीला अविनाश कासखेडीकर, ठाणे

सकारात्मक विचारांचे फळ
मी नेहमी सकारात्मक विचार करते. त्या दिवशी पीतांबरीची उत्पादने खरेदी करतानाही पारितोषिक मिळावे, अशी इच्छा मनात धरली होती. त्यानुसार मला सुवर्णमुद्रा मिळाली. केवळ बातम्याच नव्हे तर योग्य वैचारिक भूमिका घडविणारे वर्तमानपत्र म्हणून लोकसत्ताविषयी आमच्या मनात आदर आहे.
सुनीता काळे, ठाणे

रिटर्न गिफ्ट
मी आईला फ्रीज गिफ्ट दिले. त्या वेळी बिलासोबत मिळालेले कुपन भरून दिले. त्यावर काही पारितोषिक मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र परवा अचानक लोकसत्तेतून फोन आला, तेव्हा खूप आश्चर्य आणि आनंद वाटला. आईकडून मिळालेले रिटर्न गिफ्ट, अशी माझी पारितोषिकाबाबत भावना आहे.
रोहिणी गरकेरा, कल्याण