उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत प्रचाराची सुरुवात केली. समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाकांक्षी योजना श्रेय घेण्यासाठी केंद्राने केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.  ‘अच्छे दिन’ऐवजी जनतेला हातात झाडू घ्यावा लागला किंवा योगासने करायला लावली, अशी खिल्ली उडवली.नोटाबंदीच्या मुद्दय़ावर त्यांनी भाजपवर टीका केली. २०१२ च्या जाहीरनाम्यात पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे त्यांनी येथील सभेत सांगितले. त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर आघाडीला तीनशेवर जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. विरोधक गलिच्छ राजकारण करीत असून, आमचा विकासावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले.