दोन टप्प्यांमधील १४० जागांसाठी मतदान झाल्यानंतरही उत्तर प्रदेशच्या निकालाचा अंदाज येईना

उत्तर प्रदेशातील राजकीय चित्र पहिल्यापासून धूसर होतेच. पण पहिल्या दोन टप्प्यांमधील १४० जागांसाठी मतदान झाल्यानंतरही हवेचा नीट अंदाज येत नसल्याने जनमताचे गूढ आणखीनच गहिरे झाले आहे. जाहीररीत्या राणा भीमदेवी थाटात बहुमताची गर्जना करणारे तीनही मुख्य पक्ष आतून चांगलेच हवालदिल झाल्याचे दिसते.

गेल्या दोन-तीन महिन्यांतील वेगवान घटनांनी लोकसभेत ८० खासदार पाठविणारया या राज्यातील राजकीय चित्र अधांतरी होते. पहिल्या दोन टप्प्यांनंतर हवेचा अंदाज येईल, असे तेव्हा सांगितले जायचे. बिहारमध्ये तसे पाहायला मिळाले होते. पहिल्या दोन टप्प्यांमध्येच नितीशकुमार-लालूंची बाजी स्पष्ट झाली होती. पण उत्तर प्रदेशातून येत असलेली माहिती आणखीनच गोंधळात टाकणारीआहे. १५ फेब्रुवारीरोजी पश्चिम उत्तर प्रदेश व रोहिलखंडमधील २६  जिल्तील मतदान झाले. पण त्यानंतरही हवेचे गूढ उलगडण्याऐवजी ती आणखीनच धुरकटली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मायावती यांच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त झुकलेला मुस्लिम समाज.

मथुरेपासून मुझफ्फऱ्नगपर्यंत आणि सहारनपूरपासून बरेलीपर्यंत पसरलेले पहिले दोन टप्पे मुस्लिमबहुल आहेत. मुस्लिमांचा स्वाभाविक ओढा समाजवादी पक्षाकडे आहे. त्यातच काँग्रेसशी आघाडी झाल्याने धर्मनिरपेक्ष मतांची आणखी बेगमी झाल्याचे मानले जात होते. पण प्रत्यक्षात जमिनीवर मुस्लिमांमधील मोठा घटक मायावतींकडे निर्णायकरीत्या सरकल्याचे दिसते आहे. स्वतची दलित मतपेढी शाबूत ठेवतानाच ’डी-एम’ (दलित- मुस्लिम) समीकरण बऱ्यापैकी जुळविण्यात मायावतींना यश मिळाल्याचे एकंदरीत सर्वाचा सूर आहे. खुद्द मायावतींचा आत्मविश्वास दुणावल्याचे त्यांच्या देहबोलीतून जाणवते.

अखिलेश सावध

मुस्लिम मतांच्या फाटाफुटीचा अंदाज आल्याने अखिलेशसिंह सावध झाल्याचे  मानले जात आहे. त्यामुळेच भाजपच्या मध्यमवर्गीय मतांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सोडून अगोदर स्वतची मुस्लिम मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी ते एकदम बचावात्मक पावित्र्यात गेले आहेत. आक्रमण ते बचाव असा त्यांच्या रणनीतीत बदल झालाय. म्हणून ते आता मोदींना कमी, पण मायावतींना जास्त लक्ष्य करीत आहेत. मायावती भाजपला राखी बांधतील, यावर जोर देऊन मुस्लिमांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेमका याउलट मायावतींचा प्रवास चालू झालाय. बचावाकडून आक्रमणाकडे. मुस्लिम मतपेढी घट्ट करण्यासाठी त्या केवळ आणि केवळ मोदींनाच लक्ष्य करीत आहेत. यापूर्वी त्यांचे प्रथम लक्ष्य अखिलेशसिंह असायचे.

फाटाफूट भाजपच्या पथ्यावर?

२५ ते ३५ टक्के प्रमाण असलेली मुस्लिम मते कोणा एकाच्या पारड्यात गेली असती तर भाजपला चंबूगबाळे आवरावे लागले असते. समाजवादी व काँग्रेसमधील आघाडीनंतर मुस्लिम एकगठ्ठा तिकडे सरकरण्याचा शंकेने भाजपला कमालीचे ग्रासले होते. पण पहिल्या दोन टप्प्यांतील ध्रुवीकरणाने भाजपने सुटकेचा सुस्कारा सोडल्याचे चित्र आहे. बहुतेक मतदारसंघात मुस्लिम मते समाजवादी व बसपामध्ये विभागल्याचा अंदाज आहे. ही स्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. पुढील पाच टप्प्यांमध्येही मुस्लिमांच्या मनातील गोंधळ आणखी वाढविण्यासाठी बसपाच्या चांगल्या कामगिरीची हवा खुद्द भाजपवाले करत असल्याचे दिसते. म्हणून तर पहिला टप्पा झाल्यानंतर अमित शहा यांनी दोन टप्प्यांमध्ये आमची लढाई बसपाबरोबर असल्याचे जाहीर केले. यापूर्वी भाजपने कायम समाजवादी पक्षाबरोबर लढत असल्याचे सांगितले होते. आतापर्यंतच्या १४०  जागांपकी ९० जागा मिळविण्याचा दावा अमित शहांनी केला असला तरी भाजपचा खरा अंदाज ६० ते ७० जागांचा आहे. शिवाय मायावतींनीही अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी केल्यास समाजवादी- काँग्रेस आघाडीपुढील आव्हान आणखी आव्हानात्मक होत जाईल. २०१२ मध्ये या १४० जागांपकी समाजवादी पक्षाने ५८ तर काँग्रेसने ८ जागा मिळविल्या होत्या. तिसरा टप्पा १९ रोजी आहे. त्यानंतर २३ व २७ फेब्रुवारीला अनुक्रमे चवथा व पाचवा टप्पा आहे. नंतर ४ व ८ मार्चरोजी अनुक्रमे सहावा व अंतिम सातवा टप्पा आहे. ११ मार्चला पाच राज्यांची मतमोजणी आहे.

  • पहिल्या दोन टप्प्यांत तिहेरी स्वरूपाचे ध्रुवीकरण पाहायला मिळाले. िहदू- मुस्लिम, जाट- मुस्लिम आणि जाट- बिगर जाट. यापकी िहदू-मुस्लिम आणि जाट-बिगर जाट भेग भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
  • ’जाटलँड’ म्हणून ओळखल्या जाणारया या टापूतील प्रभावशाली जाट लोकसभेला भाजपबरोबर गेले होते. पण आरक्षणावरून त्यांनी दंड थोपटल्याने भाजपला चिंता