17 August 2017

News Flash

चुकीच्या धोरणांमुळे तुमचा पराभव; अरुण जेटलींनी मायावतींना सुनावले

मतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप मायावतींनी केला होता.

नवी दिल्ली | Updated: March 12, 2017 10:09 AM

अरुण जेटली (संग्रहित छायाचित्र)

मतदान यंत्रामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणा-या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले आहे. मायावती यांचा पराभव हा चुकीच्या धोरणांमुळे झाला असून त्यांनी पराभवाचा स्वीकार केला पाहिजे असे जेटली यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत भाजपच्या झंझावातसमोर मायावती निष्प्रभ ठरल्या. निवडणुकीतील निकालानंतर पत्रकार परिषदेत मायावती यांनी भाजपवर आरोप केले होते. मतदान यंत्रातील कुठलेही बटण दाबले तरी ते मत भाजपच्या उमेदवाराला पडेल अशा रितीने या यंत्रांमध्ये घोटाळा करण्यात आला असा आरोप मायावतींनी केला होता. मायावतींच्या या आरोपावर अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले, मायावतींनी असे आरोप करणे योग्य नाही. भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे. मायावतींचा पराभव हा त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला असे सांगत जेटलींनी मायावतींनी केलेले आरोप फेटाळून लावले. नोटाबंदीचा निर्णय जनतेला पटला असून या निर्णयामुळे भाजपला फायदाच झाला असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मुस्लिमबहूल भागात भाजपला जास्त मतं कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत हिंमत असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे असे खुले आव्हान मायावती यांनी निकालानंतर दिले होते. लोकशाहीला धोका निर्माण झाला असून याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे असे त्यांनी म्हटले होते. मायावतींच्या बसपला उत्तरप्रदेशात फक्त १९ जागांवर विजय मिळाला आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाहीत. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये अपयश आल्याने मायावतींच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

First Published on March 12, 2017 10:09 am

Web Title: uttar pradesh election results 2017 mayawati lost because of wrong policies says arun jaitely
 1. P
  Prakash Mane
  Mar 14, 2017 at 6:20 pm
  embly election results of 5 states , gives very clear message, to govt. U are in Right way, also support for development,
  Reply
 2. P
  Prakash Mane
  Mar 14, 2017 at 6:17 pm
  Hon. PM N.Modi, pls take a decision of farmers, now farmers are services very struggle life, completely colasped, now take a very strong action, farmers stand to its own feet. .. Prakash Mane Deshmukh, baramati
  Reply
 3. S
  Sudhir Karangutkar
  Mar 12, 2017 at 5:59 am
  जातीपातीचे राजकारण कारण्यार्यांना अशाच धडा संपूर्ण भारतातील जनतेने शिकविला पाहिजे उद्या भाजप असे करेल तरीदेखील
  Reply
 4. S
  surekha
  Mar 14, 2017 at 3:58 am
  मायावतींनी उभारलेले आपले पुतळे स्वतःहून काढून टाकावेत ह्यातच शहाणपणा आहे जातीच्या नावावर दिले जाणारे आरक्षण पण हद्दपार करावे किंवा जनताच स्वतःहून करेल.
  Reply
 5. S
  Suresh Raj
  Mar 12, 2017 at 12:40 pm
  मायावती नि स्वतःच्या राजमहालात निवडणूक घ्यावी आणि पाहावे तिला किती मते मिळतात. राजमहालात तरी ५० ते ६० नोकरांचा लवाजमा आहे.
  Reply
 6. उर्मिला.अशोक.शहा
  Mar 14, 2017 at 2:32 am
  वंदे मातरम- परा झाल्या नंतर अक्कल काढा पिल्याचा भास व्हायला हवा त्या ऐवजी एरंडेल पिल्या सारखे मशीन मध्ये दोष हा सूर मायावती नि आळविला, त्याला लालू मुलायम काँग्रेस सारख्या लबाडांनी लगेच सुरात सूर मिळविला. आपले कोठे चुकले याचा विचार नाही मुसलमान मते म्हणजे आमची जहागीर या थाटात मूर्ख सारखे बोलणे हि वैफ़ल्यग्रस्तता, मतदार जनते चा अपमान याच्या म्हणण्या प्रमाणे मुसलमानांनी भाजप ला मते देऊन च नयेत का?मतदार जनता विचार करा सच्चा कोण झूठ कोण तुम्हीच ठरावा आणि नेहेमी शंभर टक्के मतदान करा जा ग ते र
  Reply
 7. S
  Shivram Vaidya
  Mar 12, 2017 at 5:42 am
  मायावतींनी मागे मुख्यमंत्री झाल्या होत्या तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये चांगले काम केले होते.मात्र त्याचबरोबर गगनभेदी भ्रष्टाचार हे त्यांच्या कारभाराचे एक वैशिष्ठ्य होते.सोशल इंजिनीअरींगचा यशस्वी प्रयोग करून दाखवल्यानंतर त्यांचे राजकारण केवळ बीसी,ओबीसी आणि मुस्लिम समाजाभोवतीच केंद्रीत राहिले.अर्थात या निवडणुकांमध्ये या तीनही घटकांनी भाजपला भरघोस मते दिल्याने,मुस्लिम भाजपला मते देऊच कशी शकतात असा "यक्ष"प्रश्न त्यांना पडला आहे.जणू काही मुस्लिमांनी मायावतींनाच मतदान केले पाहिजे असा कायदा आहे !!!
  Reply
 8. Load More Comments