महाभारतामध्ये ‘कृष्ण’ ही अवताराचे (देवत्व) महत्त्व लाभलेली व्यक्तिरेखा आहे. ‘ख्रिस्तांची व्यक्तिरेखा जेवढी खरी आहे तेवढीच कृष्णाचीही व्यक्तिरेखा खरी आहे. (असे सांगतात की क्रुसावरून ख्रिस्त नाहीसा झाला. तो कराचीमार्गे काश्मीरमध्ये पोहोचला. तेथे ख्रिस्ताची समाधी/ कबर आहे असेही समजले जाते.) कृष्णजन्म आणि ख्रिस्तजन्म या दोन घटनांमध्ये विलक्षण साम्य आहे. ख्रिस्त आणि कृष्ण या दोन नावांपासूनच साम्य जाणवायला सुरुवात होते. (काही जण तर यशोदा- जसोदा. जिझस असाही प्रवास सांगतात.) दोघांचेही जन्म मध्यरात्री झालेले आहेत. तसेच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ाच्या नंतरही झालेले आहेत.

आता प्रचलित असलेल्या कालगणनांनुसार या साम्यस्थळांचा मागोवा घेऊ या.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

सध्या जगभर प्रचलित असलेल्या इ. सनाचे १२ महिन्यांचे स्वरूप खूप उशिरा सुरू झालेले आहे. प्रत्यक्षात ही कालगणना बाबिलोनियनांनी इ. स. पूर्व ९०० वर्षे तरी सुरू केलेली असावी असे समजतात. म्हणजे ही कालगणना इ. स. २०००+९०० = २९०० वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे. ‘महाभारताची कालनिश्चिती’ या ‘लोकप्रभा’तील लेखामध्ये पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर आणि डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या संशोधनाबरोबर हा काळ जुळतो. कालनिर्णय पंचांगानुसार भारतातील धर्मराजा युधिष्ठीर शकाची ३०४४ वर्षे झालेली आहेत.

सुरुवातीचे बाबिलोनियन लोकांचे वर्ष फक्त १० महिन्यांचे आणि ३०४ दिवसांचेच होते. इ.स. पूर्व ६९३ मध्ये न्युपा नावाच्या राजाने त्यामध्ये सुधारणा केली. आणि त्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हे आणखी २ महिने वाढवून वर्षांचे ३६५ दिवस केले.  पूर्वीचे १० महिने वर्षांमध्ये फक्त मार्च ते डिसेंबर एवढेच महिने होते. त्यामुळे न्युपाने मार्च हा वर्षांरंभ बदलून जानेवारी हा वर्षांरंभ केला. मार्च ते डिसेंबर या महिन्यांची नावे बघितल्यास असे दिसेल की त्या वर्षांतील ६ वा महिना ऑगस्ट षष्ठ मास येतो. तसेच ७ वा महिना सप्टेंबर – सप्तम. ८ वा महिना ऑक्टोबर अष्टम मास, ९ वा महिना नोव्हेंबर नवम मास, तर शेवटचा १० वा महिना डिसेंबर दशम मास येतो. रोमन लोकांना दशमान पद्धत माहीत नसल्याने त्यांनी दशम म्हणजे दहाव्या महिन्यासाठी  -टं२ (दशम मास) ही संज्ञा वापरलेली आहे.

म्हणजेच ख्रिस्ताची जन्म हा १० व्या महिन्यातच झालेला आहे. -टं२ चे वास्तव हेच आहे.

आता भारतीय कालगणनेनुसार कृष्णजन्म या घटनेचा मागोवा घेऊ या.

महाराष्ट्रात जरी शालीवाहन शक प्रचलित असला तरी इतरत्र मात्र विक्रम संवतच अनुसरले जाते. या विक्रम संवताचा पहिला महिना कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे. जो आपण दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतो. तर व्यापारीवर्ग गुजराथी संवत याच दिवशी नववर्षांच्या चोपडय़ांचे पूजन करतो. त्यामुळे कार्तिक मासापासून श्रावण मास हा १० वा महिना येतो. तसेच कृष्णाष्टमी हा दिवसही पहिल्या पंधरवडय़ाचे १५ दिवस अधिक अष्टमीचे ८ दिवस म्हणजे महिन्याच्या २३ व्या दिवशी येतो. तर ख्रिस्तजन्म महिन्याच्या २५ व्या दिवशी साजरा केला जातो. क्षय/ वृद्धी तिथीनुसार त्या वेळी हा काळ २५ दिवसांचाही असण्याची शक्यता आहे.

वर लिहिल्याप्रमाणे दोघांचा जन्मही मध्यरात्रीच झालेला आहे. दोघांचे बालपणही गुरे-शेळ्या राखण्यात गेले आहे. ख्रिस्ताचा मृत्यू हातापायांत खिळे ठोकल्याने झाला. तर व्याधाने चुकून मारलेला बाण पायात घुसल्याने कृष्णाचा मृत्यू झालेला आहे. दोघांच्या आयुष्यातील साम्य मात्र इथेच संपते. श्रीकृष्ण अगदी बालपणापासून प्राणघातक संकटांना सामोरे जात वाढला. अन्यायाविरुद्ध लढताना नातेवाईकांचीही गय केली नाही. राजेशाही आयुष्य जगला. तर ख्रिस्त मात्र दया, क्षमा, शांतीचा उपदेश करीत सामान्य आयुष्य जगला.

पंचांगातील माहितीनुसार आज घटकेला इंद्रप्रस्थामध्ये धर्मराज युधिष्ठिराच्या शकाला ३०४४ वर्षे झालेली आहेत. विक्रम संवताला २०७२ वर्षे, शालिवाहन शकाला १९३७ वर्षे, तर इ. सनाला फक्त २०१५ वर्षेच पुरी झालेली आहेत. भारतीय कालगणनेनुसार जरी वर्षांरंभ वेगवेगळे असले तरी महिन्यांची नावे, क्रम मात्र सारखेच आहेत. कारण भारतीय कालगणनेनुसार दर पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला दिले जाते. त्यामुळे ज्या वेळेला  नक्षत्र ज्योतिषाचा कालगणनेशी संबंध जोडला गेला असावा त्या वेळेपासूनच ही पद्धत अस्तित्वात आली असावी.

डॉ. ढवळीकर, डॉ. जामखेडकर यांच्या संशोधनानुसार महाभारताचा काळ ३१०० वर्षे इतका जुना येतो. युधिष्ठिर शक ३०४४ वर्षे जुना आहे. तर इ. शकानुसार कृष्ण आणि ख्रिस्तजन्मांचा अंदाजही तितकाच आहे.

भारतीय राजांचे संबंध गांधापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कृष्ण चरित्र युरोपमध्ये पोहोचायला ५०-१०० वर्षेही लागली असतील. बहुधा त्यामुळेच कृष्णजन्म ख्रिस्तजन्मामध्ये विक्रम संवत २०७२ वजा इ. स. २०१५ मध्ये ५०-५५ वर्षांचा फरक दिसत असावा.
शशिकांत काळे – response.lokprabha@expressindia.com