rekhafood04साहित्य : चिरलेला कोबी १ वाटी, कांद्याची पात १ वाटी, २ सिमला मिरची चिरून, एक गाजर बारीक करून, २ पालक पाने, २ बटाटे उकडलेले, आले लसून पेस्ट १ चमचा, तिखट, मीठ, धनेजिरे पूड १ चमचा. लिंबू रस, बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिम्बीर, तेल, तीळ (सेसमे) २ टे. स्पून. कॉर्न फ्लोअर २ मोठे चमचा.

कृती : कोबी, कांद्याची पात, सिमला मिरची, गाजर, पालक, सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून व नंतर दाबून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. त्यात १ चमचा कॉर्न फ्लोअर, मॅश केलेला बटाटा, आले लसून पेस्ट, धनेजिरे पूड, चवीप्रमाणे तिखट, मीठ, लिंबूरस टाकून रोल करून घ्यावे.

एका ताटात कॉर्न फ्लोर, तीळ, बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, एकत्र करून त्यात केलेले रोल घोळवावे व गरम तेलात क्रिस्पी तळून सॉस किंवा आंबट-गोड चटनी सोबत सव्‍‌र्ह करावे.
रेखा आलंदकर, बारामती – response.lokprabha@expressindia.com