साहित्य : मोठे बन्स, ढोबळी मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, पनीर, मोझेरोला चीझ, मशरूम, हवे असल्यास चिकनचे मीठ घालून शिजवलेले तुकडे, टोमॅटो सॉस, साखर, मीठ, गावरान तूप.

कृती : ढोबळी मिरची, कांदा, मशरूम, पनीर, हिरव्या मिरच्या बेतशीर आकारात कापून घ्याव्या. पॅनमध्ये तूप घालून हे सर्व हलके परतून घ्यावे. साखर, मीठ चवीप्रमाणे वापरावे.

बनची वरची लालसर चकती कापून घ्यावी. उरलेल्या बनला आतला मऊ भाग काढून वाटीचा आकार द्यावा. वाटीला आतून टोमॅटो सॉस, तुपाचे बोट लावून घ्यावे. आता या वाटीत परतलेली भाजी भरावी वर मोझेरोला चीझ किसून घालावे. मध्ये एक सॉसचा ठिपका लावावा. बनला खालून तूप लावून निर्लेप तव्यावर ठेवावे. वरून झाकण लावावे. ओव्हन असल्यास फारच छान. आठ-दहा मिनिटांत घरभर तयार पिझ्झाचा सुगंध पसरतो.

डॉ. अ. रा. गोडसे – response.lokprabha@expressindia.com