‘आपलीच माणसे होती आपलीच वैरी’ या सुवर्णा दामले लिखित लेखात दु:खाची जाणीव देणारे ज्वलंत विचार, एक नवीनच ऊर्मी देणारे विचार मांडल्याबद्दल आभार. आधीच दुष्काळाने जमीन निष्ठुर झाली आहे, त्यातच पतीच्या आत्महत्येनंतर भरडल्या जाणाऱ्या विधवांचे विदारक सत्य सुन्न करणारे आहे. याचा घरावर, लहान मुलांवर काय परिणाम होत असेल याचा विचार करायलाच हवा. कारण सासरी परंपरावादी लोकांना नातू हवा आहे नात नाही. खरेच का महाराष्ट्र इतका प्रतिगामी आहे? आधीच जीवनाची घडी बसवणे खूपच जिकिरीचे होऊन बसलेले असते. त्यात जागरूकता, समाजप्रबोधन करायला कुणी राजा राममोहन राय, म. फुले, लोकहितवादी यांनी जन्म घेण्याची वाट पाहण्यापेक्षा, आपण मिळून यातून मार्ग काढलेला नक्कीच चिरकाल टिकेल.

अनेक संस्था या पीडितांच्या दु:खावर प्रेमाची, मायेची, आपुलकीची फुंकर घालत आहेत. फक्त यात आता जास्त भर पडावी ती आपल्या कुंभकर्णी सरकारची!

– डॉ. सचिन साले, अहमदनगर</strong>