scorecardresearch
Vaktrutva Spardha 2016

नियम आणि अटी

स्पर्धेत प्रवेशपत्रिका सादर करण्यासाठी पात्रता

  • प्रवेश पत्रिका (अर्ज/फॉर्म) indianexpress-loksatta.go-vip.net/vaktrutva-spardha/entryform येथून डाऊनलोड करता येईल.
  • स्पर्धक हा कोणतेही मान्यताप्राप्त कनिष्ठ/वरिष्ठ शैक्षणिक महाविद्यालयाचा विद्यार्थी/विद्यार्थिनी असावा/असावी. स्पर्धकांनी अर्जासोबत महाविद्यालयाने दिलेल्या त्यांच्या ओळखपत्राची स्कॅन केलेली व स्वत: साक्षांकित केलेली प्रत पाठविणे आवश्यक आहे. स्पर्धकाचे वय १६ वर्षे (पूर्ण) ते २४ वर्षे (पूर्ण) या दरम्यान असले पाहिजे. जर स्पर्धकाची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली नसतील तर त्याच्या पालकाचे परवानगीपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
  • स्पर्धक, आमच्या महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षांत शिक्षण घेत आहे’ अशा आशयाचे महाविद्यालयाचे प्रमाणपत्र स्पर्धकाने प्रवेश अर्जासोबत जोडले पाहिजे.
  • प्रत्येक महाविद्यालयातून फक्त दोन स्पर्धकांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.
  • स्पर्धक व्यक्ती भारताचा नागरिक/भारताचा कायम निवासी/भारतात मूळ असणारी अथवा भारतीय परदेशी नागरिक असणारी (ओसीआय) असावी.
  • ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव येथील खऱ्याखुऱ्या (बोनाफाईड) विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
    स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क (फी) नाही.
  • स्पर्धेतील प्रवेश/ भाषण हे स्पर्धकाने स्वत: तयार केलेले असले पाहिजे. त्यात काही गद्य/पद्य अवतरणे उद्धृत केल्यास त्याच्या लेखकांची माहिती दिली पाहिजे. स्पर्धकाचे भाषण ही त्याची व्यक्तिगत बौद्धिक संपदा समजली जाईल व तिचे स्वामित्व/ मालकी संपूर्णपणे स्पर्धकाकडे राहील (उद्धृत केलेल्या अवतरणाव्यतिरिक्त)
  • स्पर्धकाच्या भाषणात/ अभिव्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द, तिरस्कार, सांप्रदायिक, जातीय, बदनामीकारक, लैंगिक, क्षोभक, अवमानकारक, राजद्रोह संकल्पना, विचार किंवा भाषा नसेल, तसेच त्यात बेकायदेशीर, अवैध, अनैतिक आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधी असा कोणताही मजकूर नसेल. याशिवाय ज्यामुळे कुणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप किंवा भंग होईल, असा मजकूर किंवा अन्य कुणाच्या बौद्धिक संपदेचे उल्लंघन करणारे काहीही आपल्या भाषणात नाही याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी.
    स्पर्धकांनी सर्व काळात व्यक्तिगत सभ्याचार, शिष्टाचार, विवेक, प्रतिष्ठा यांचे पालन करावे.
  • नियोजित वेळ, तारीख व स्थळ येथे स्पर्धक उपस्थित नसल्यास किंवा संमतीपत्रातील अटींचा भंग करणाऱ्या स्पर्धकांना अपात्र ठरविले जाईल.
  • स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धकाने आपली प्रवेशिका आणि भाषणाची प्रत किंवा सारांश लिखित स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक स्पर्धकाने आपण स्वत: व आपली प्रवेशिका पात्रतेचे सर्व निकष/ कसोटय़ा पूर्ण करणाऱ्या असल्याबद्दल, तसेच दिलेला तपशील व कागदपत्रे यात तिचा सहभाग अपात्र ठरवेल, अशी काहीही माहिती/ चूक नाही याबद्दल खात्री करून घ्यावी.
  • स्पर्धेच्या जागी येण्याची व्यवस्था स्पर्धकाला स्वत:च करावयाची आहे. त्याबाबत आयोजक (टीआयईएल) यांच्यावर कसलीही जबाबदारी नाही.
  • प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या वेळी आणि जागी आपले शारीरिक आरोग्य व मन:स्थिती चांगली असल्याबद्दल खात्री करून घ्यावी.
    कोणत्याही प्रकरणी आयोजकांचा निर्णय हा अखेरचा, बंधनकारक व अंतिम स्वरूपाचा असेल. निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल. (मात्र अपवादात्मक परिस्थितीत निकाल जाहीर न करण्याचा आपला अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.)
  • महाअंतिम (ग्रॅण्ड फायनल) स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना मुंबई येथे येणे-जाणे याचा प्रवास खर्च व राहण्याची सोय व खर्च स्वत:लाच करावा लागेल. याविषयी आयोजकांवर कोणतीही जबाबदारी नाही.
  • कोणताही स्पर्धक स्पर्धेच्या जागेवर किंवा त्यापूर्वी तेथे तंबाखू/ मद्य किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर पदार्थ आणणार नाही किंवा त्यांचे सेवन/वापर करणार नाही व कोणतेही त्रासदायक वर्तन करणार नाही.
  • या स्पर्धेचे आयोजक (दि इंडियन एक्स्प्रेस लि.) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणि/ किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे/ वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत. स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणे/ नाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.
  • परीक्षक मंडळ – प्रवेशिका/ भाषणे यांची अल्पसूची (शॉर्ट लिस्ट) तयार करणे आणि विजेते ठरविणे यासाठी आयोजक (दि इंडियन एक्स्प्रेस लि.) एक परीक्षक मंडळ तयार करील. परीक्षकांचा व दि इंडियन एक्स्प्रेस लि. यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.
  • मालकी हक्क :
    – सर्व स्पर्धक आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस लि. यांना पुढील बाबतीत, कोणताही बदल न होणारे आणि वगळले जाणार नाहीत आणि स्वामित्व अधिकारापासून मुक्त असलेले परवाने देतील.
    – स्पर्धेचे भाषणांचे/ निवड प्रक्रियेचे आणि विजेते ठरविण्याच्या प्रक्रियेचे फिल्म/ व्हिडीओ टेप/ ऑडिओ टेपद्वारे चित्रीकरण/ ध्वनिमुद्रण करणे आणि भविष्यात स्पर्धा प्रोत्साहनासाठी त्याचा वापर करणे.
    – स्पर्धेतील प्रवेशिका/ भाषणे मुद्रित प्रकाशने/ जाहिराती आणि प्रसिद्धी याद्वारे प्रकाशित करणे, छापणे, ऑनलाइन प्रदर्शित करणे. ही कृती फक्त एक्स्प्रेस ग्रुपसाठी मर्यादित नसेल.
    – स्पर्धक प्रमाणित करतात की, तो/ती यांच्याकडे या स्पर्धेत प्रवेश करण्याचे संपूर्ण अधिकार आणि र्सवकष प्राधिकार आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती/ संस्था यांचा कोणताही दावा/ मोबदला, संबंधित शिक्षक यांचा संबंध येत नाही.
  • मर्यादा – या स्पर्धेतील प्रवेशिका/ भाषणे किंवा त्यातील समाविष्ट मजकूर याबाबत स्पर्धा आणि आयोजक ‘दि इंडियन एक्स्प्रेस लि.’ हे कोणत्याही परिस्थितीस, कधीही जबाबदार राहणार नाहीत. संबंधित वक्ता/ स्पर्धक हाच/ हीच त्याची/ तिची प्रवेशिका/ भाषण आणि त्यातील समाविष्ट मजकूर याला जबाबदार राहील.
  • पारितोषिके – स्पर्धा आयोजक पारितोषिके जाहीर करतील. पारितोषिकाच्या ऐवजी कोणतीही रोख रक्कम किंवा मोबदला दिला जाणार नाही. सदर पारितोषिके जाहीर झाल्यापासून ४८ तासांच्या आत मुंबई कार्यालयातून नेण्यात यावीत अन्यथा ती विजेत्यांना त्याच्या संपूर्ण जबाबदारीवर आणि ‘जसे आहे त्या स्थितीत’ पाठविले जातील. जर काही कर असल्यास ते विजेत्याला भरावे लागतील.
  • गोपनीयतेचे धोरण :
    दि इंडियन एक्स्प्रेस लि. ही संस्था स्पर्धकांची व्यक्तिगत गोपनीय माहिती आणि तिचा वापर याचा आदर बाळगते. जर स्पर्धकांस स्पर्धेच्या गोपनीयतेच्या धोरणाबद्दल काही प्रश्न असतील तर त्याने/ तिने प्रश्न दि इंडियन एक्स्प्रेस लि. यांना ई-मेल, पत्ता makrand.patil@expressindia.com येथे पाठवावेत.
  • न्याय क्षेत्र : या अटींच्या संबंधीचे कोणतेही प्रकरण उद्भवल्यास ते भारतीय कायदा आणि त्याची रचना याच्या अमलानुसार चालेल व मुंबई न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रात ते असेल.
  • क्षतिपूरण व दायित्वाच्या मर्यादा : स्पर्धक (आणि अल्पवयीन असल्यास त्यांचे पालक) क्षतिपूरण करतील. आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाकडून स्पर्धेतील प्रवेशिका/ भाषणे यामुळे आणि / किंवा या संमतीपत्राच्या भंगामुळे /आणि / किंवा वर दिलेले तुमचे निवेदन आणि हमी यामुळे जर कोणतीही हानी, नुकसान, दायित्व, दावा किंवा मागणी (वकिलांच्या रास्त शुल्कासह) केल्यास ही स्पर्धा, तिचे आयोजक, त्यांच्या उपकंपन्या, संलग्न संस्था आणि त्यांचे संबंधित अधिकारी, प्रतिनिधी, संचालक, संपादक, भागीदार व कर्मचारी यांना त्यापासून मुक्त (क्षतिपूर्ती केलेले) आणि निरुपद्रवी असल्याचे मानतील. सदर निवेदने, हमी, परवाने, क्षतिपूरण आणि दायित्वाच्या मर्यादा या सर्व बाबी स्पर्धेनंतर उत्तरजीवी ठरतील.
    कोणत्याही प्रसंगी, स्पर्धकांच्या प्रवेशिका/ सहभाग यांच्यामुळे आणि जरी त्यांना अशा सहभागामुळे असे काही नुकसान होऊ शकते असा सल्ला मिळाला असला तरी, हे स्पर्धक किंवा तिसरा पक्ष यांना कोणत्याही प्रकारचे अप्रत्यक्ष, परिणामस्वरूप, दहशतीचे, प्रासंगिक, विशेष किंवा सजापात्र असे नुकसान झाल्यास त्याला सदर स्पर्धा, तिचे आयोजक, दि इंडियन एक्स्प्रेस लि., त्यांच्या उपकंपन्या, संलग्न संस्था, त्यांचे संबंधित अधिकारी, प्रतिनिधी, भागीदार, कर्मचारी हे स्पर्धकांना किंवा तिसऱ्या पक्षाला जबाबदार राहणार नाहीत.
    तसेच कोणत्याही तांत्रिक किंवा अन्य कारणास्तव किंवा लघु चित्रपट अपलोड करण्याचा किंवा त्यानंतर कधीही, कोणतेही नुकसान, खराबीने हानी झाल्यास त्यास आयोजकांपैकी वरील कुणीही जबाबदार राहणार नाहीत.