ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत विठ्ठलनामाचा गजर करीत शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखी सोहळय़ाचे मंगळवारी सकाळी सोलापुरात आगमन झाले. महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखी सोहळय़ाचे स्वागत केले. शहरात विविध पारंपरिक मार्गावरून हळूहळू चालत हा पालखी सोहळा प्रथम श्री प्रभाकर महाराज मंदिराकडे गेला आणि नंतर दुपारी उशिरा कुचन प्रशालेत मुक्कामासाठी विसावला. हजारो भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video

श्री गजानन महाराजांच्या शेगाव-पंढरपूर पालखी सोहळय़ाचे अंतर तब्बल ७५० किलोमीटर इतके मोठे आहे. पालखी सोहळय़ाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. काल सोमवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन होताच सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. वीरेश प्रभू, प्रांत श्रीमंत पाटोळे आदींनी पालखीचे स्वागत केले. उळे गावात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी शहरात श्री रूपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी चौकात पोहोचली. तेव्हा महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, पालिका स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, पालिका सभागृहनेते सुरेश पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त महादेव तांबडे आदींनी पालखीचे स्वागत केले. स्वागतानंतर पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला.

या पालखी सोहळय़ात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. ३३ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापुरात आगमन झालेल्या या पालखी सोहळय़ात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय होता. श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळय़ांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी मानाचे अश्व होते. देवाच्या अश्वालाही स्पर्श करून भाविक दर्शन घेत होते. पालखी सोहळय़ाच्या पारंपरिक मार्गावर स्थानिक भाविकांनी आपापल्या घरासमोर रस्त्यावर सडासंमार्जन करून सुरेख रांगोळी रेखाटल्याचे दिसून आले.

तर रस्त्यावर अनेक ठिकाणी भाविक व कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी अल्पोपाहाराची सोय करून मनोभावे सेवा रुजू केली होती. पालखी सोहळय़ाचा सोलापुरात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. पहिल्या दिवशी रविवार पेठेतील कुचन प्रशालेत तर उद्या बुधवारी दुसऱ्या दिवशी मोदीखान्यातील उपलप मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी सकाळी पालखीचा दळभार मोदीखान्यातून रेल्वेस्थानक, भैया चौक, मरिआई चौक, देगाव व तिऱ्हे मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.