प्रत्येक अपार्टमेंट असोसिएशनकडे जमा होणाऱ्या रकमेची गुंतवणूक कशी व कोठे करावी याबाबत अपार्टमेंट कायदा १९७० मध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे. बऱ्याच अपार्टमेंट असोसिएशनमध्ये निधीची गुंतवणूक कशी व कोठे करावी याबाबत संभ्रम असतो, कारण सहकारी संस्थेची गुंतवणूक फक्त सहकारी बँकांमध्येच करण्याचे कायदेशीर बंधन आहे. तसे बंधन अपार्टमेंट कायद्यात नसल्याने बऱ्याच संस्थांना प्रश्न पडतो. कारण अपार्टमेंट कायद्यात निधीची गुंतवणूक सहकारी बँकेत किंवा अन्य कोणत्याही बँकिंग कंपनीमध्ये असा उल्लेख असल्यने खरा संभ्रम निर्माण होतो. परंतु अपार्टमेंट असोसिएशनच्या निधीची गुंतवणूक कायद्यानुसार कोणत्याही बँकेत करता येते, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणूनच अपार्टमेंट कायदा १९७० मधील तरतुदी प्रत्येक अपार्टमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यासल्यास संघाचे कामकाज नक्कीच योग्यप्रकारे चालू शकेल. असे माझे मत आहे.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
An appeal to complain to district administration if If not given leave for voting
मतदानाला सुट्टी न देणे महागात पडणार

नियम क्र. ४५निधी (फंड)

अपार्टमेंट असोसिएशनला खाली उल्लेखलेल्या एका अगर एकाहून अनेक मार्गाचा अवलंब करून निधीची उभारणी करता येईल.

१) सभासदांकडून भागाची रक्कम घेऊन (किमान एक भाग) रु. १००, रु. ५०० इ.

२) अपार्टमेंटधारकांकडून मासिक शुल्काची निश्चिती करून त्याप्रमाणे रक्कम जमा करून घेणे किंवा अपार्टमेंटधारकांकडून ऐच्छिक देणगीच्या रूपाने संघाच्या निधीची उभारणी करता येईल.

३) अपार्टमेंट संघाच्या ताळेबंदानुसार झालेला नफा- जो राखीव निधीमध्ये वर्ग करता येऊ शकतो असा निधी.

४) अपार्टमेंट संघटना गरज भासल्यास कोणत्याही वित्तीय संस्थांकडून कर्जदेखील उभारता येते. परंतु त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक.

नियम क्र. ४६निधीची गुंतवणूक

अपार्टमेंट असोसिएशनला निधीची गुंतवणूक खाली नमूद केलेल्या बँकांमध्ये करता येईल.

१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा राज्य सहकारी बँक.

२) भारतीय विश्वस्त कायदा १८८२ च्या कलम २० नुसार उल्लेखल्याप्रमाणे निधीची गुंतवणूक करता येते.

३) नियम ४६ (१) मध्ये उल्लेखलेल्या बँकांव्यतिरिक्त राज्यातील कोणत्याही सहकारी बँकेमध्ये किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असोसिएशनच्या निधीची गुंतवणूक करता येऊ शकते.

नियम क्र. ४७संलग्नता (ॅफिलेशन)

अपार्टमेटं संघाची नोंदणी झाल्यावर त्या विभागातील अपार्टमेंट संघाच्या महासंघाची वर्गणी भरून सदस्यत्व घेईल व महासंघाच्या नियमाप्रमाणे त्यांनी ठरवलेल्या रकमेचा भरणा वेळच्या वेळी करेल. महासंघाचे सदस्यत्व किंवा संलग्नता घेण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची संमती घ्यावी.

नियम क्र. ४८हिशोब पत्तक (अकाऊंट्स)

१) अपार्टमेंट असोसिएशचा दैनंदिन आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी कोणत्याही बँकेत संघाच्या नावाने खाते उघडून त्यामध्ये सभासदांकडून प्राप्त झालेली रक्कम जमा करावी. तसेच त्यापैकी रु. १००/- पर्यंतची रोख रक्कम खर्चासाठी काढून सचिवाने किंवा खजिनदाराने गरजेनुसार खर्च करावी. तसेच २० रुपयांवरील सर्व खर्च संघाने चेकनेच करावा. चेकवर सचिव आणि संघाच्या मंडळातील एका सदस्याची स्वाक्षरी घ्यावी, नंतरच चेक द्यावा.

२) अपार्टमेंट संघाच्या सचिवाने प्रत्येक अपार्टमेंटधारकाच्या नावाने हिशोबाचे नोंद पुस्तक (पास-बुक) तयार करून घ्यावे. त्यामध्ये अपार्टमेंटधारकाने संघास अदा केलेली रक्कम तसेच नफ्याची रक्कम जमा केलेली दर्शवावी. त्यानुसार अपार्टमेंटधारकांकडून येथे रक्कम व प्रत्यक्ष देय रक्कम ठरवावी.

३) प्रत्येक अपार्टमेंट संघाने दरवषी ३१ जुलैपर्यंत किंवा तत्पूर्वी सामाजिक सेवा- सुविधांच्या खर्चाचा ताळेबंद लेखापरीक्षकाकडून (सी.ए.) तयार करून सभासदांना सादर करावा. त्यामध्ये- अ) नफा- तोटा पत्रक ब) मागील आर्थिक वर्षांचा जमा-खर्च क) संघाच्या मालमत्तेचा तपशील व संस्थेची देणी दर्शविणारी माहिती इ.

४) अपार्टमेंट संघाने तयार केलेला आर्थिक ताळेबंद सक्षम अधिकाऱ्यांना दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत सादर करून तो प्रत्येक अपार्टमेंटधारकाला पाहण्यासाठी कार्यालयात उपलब्ध करून ठेवावा व कार्यालयीन

वेळेत येऊन तपासण्याचे प्रत्येक अपार्टमेंटधारकाला कळवावे.

५) आर्थिक हिशोब पत्रकासोबत सर्व अपार्टमेंटधारकांच्या नावांची यादी जोडणे आवश्यक असून, आर्थिक हिशोब पत्रकात समायिक सेवा सुविधांचा जमा-खर्च कोणत्या तारखेपर्यंत घेतला आहे, याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

नियम क्र. ४९ अपार्टमेंट संघाच्या आर्थिक हिशेब पत्रकाच्या प्रती तसेच लेखापरीक्षकांचा अहवाल (ऑडिट रिपोर्ट) संघाच्या नोटीस बोर्डावर सर्वाना पाहण्यासाठी लावून ठेवावा. नोटीस बोर्ड सर्व सभासदांना पाहता येईल अशा ठिकाणी बसवावा.

नियम क्र. ६०लेखा परीक्षकाची नेमणूक

अपार्टमेंट संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वाच्या मान्यतेने संघाचे हिशोब तयार करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याचा ठराव पारित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे लेखापरीक्षकाने संघाची हिशोबपत्रके, ताळेबंद तयार करून संघास सादर करावी.

नियम क्र. ५१लेखापरीक्षकांचे अधिकार

प्रत्येक लेखापरीक्षक संघाचे हिशोब पत्रक तयार करताना संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास बोलावून हिशोबासंबंधीची माहिती, कागदपत्रे, बँक पासबुक,  इ. घेऊ शकतो व त्यानुसार वस्तुस्थितीदर्शक संघाचे ताळेबंद व हिशोब पत्रक तयार करून संघास स्वत:च्या सहीने अहवाल व ताळेबंद सादर करू शकतो.

advjgk@yahoo.co.in