shrinivas-ghaisas
* मी, २०१० मध्ये नवी मुंबई येथे फ्लॅट घेतला आहे. सदर फ्लॅट हा री-डेव्हलपमेंट केलेल्या सोसायटीमध्ये आहे. ‘सिडको’कडून मला ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळाले आहे, मी सर्व प्रकारचे स्थानिक कर भरत आहे. तरीही विद्यमान सोसायटीकडून मला सभासदत्व मिळत नाही, ते मिळविण्यासाठी काय करावे याचा सल्ला मिळावा.
– सुशांत देठे, नवी मुंबई.
* आपल्याला जर गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व घ्यायचे असेल, तर त्या संस्थेचे ‘भाग’ (शेअर्स) घ्यावे लागतात. संस्थेचे सभासदत्व मिळविण्यासाठी आवश्यक असलेले विविध नमुन्यांतील फॉर्म भरून द्यावेत. आपण आपल्या प्रश्नात, सोसायटीने आपला अर्ज नाकारला आहे का, आपण सदस्यत्वासाठी अर्ज केला का, याचा काही खुलासा केला नाही. आपण नवीन सदस्य म्हणून गृहनिर्माण संस्थेत सामील होणार आहात असे गृहीत धरून आपणाला असे कळवावेसे वाटते की, ही जबाबदारी विकासकाची असते, त्यामुळे त्याच्याशी संपर्क करून त्याचा पाठपुरावा करावा.

* माझ्या मामाची जमीन २००७ रोजी विक्रीसाठी रजिस्टर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी केली. पण ३२/ग ची जमीन असल्याने आणि ‘सेल परमिशन’ न आणल्याने ते ट्रान्झ्ॉक्शन कम्प्लीट झाले नाही. ७/१२ मध्ये ३ मामा आणि ३ मावशींपैकी माझी आई, जी २०१४ मध्ये निधन पावली, आता मी आम्हा ५ भावंडांची त्या ७/१२ मध्ये नावे लावली आहेत. पॉवर देणारी/घेणारी व्यक्ती जर मरण पावली तर ती पॉवर कॅन्सल होते असे वाचनात आले आहे. तर आमची ही केली गेलेली ‘पॉवर’ कॅन्सल होऊ शकते का?
– पॅडी हजारे
* आपला प्रश्न विचारण्यामध्ये काही तरी गोंधळ झालेला दिसतो. खरे तर या सदरातून आम्ही ‘कुळकायद्या’विषयी उत्तरे देत नाही, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आपणास कळवू इच्छितो की, कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) ती, कुलमुखत्यारपत्र देणारा अथवा घेणारा यांपैकी कोणीही मरण पावले तरी आपोआप रद्द होते. खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आता नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र म्हणजे रजिस्टर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी लागते. हे आम्ही या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो.
*  माझ्या एका मित्राच्या आईचे इंग्लंडमध्ये निधन झाले. तिची राजकोट, भारत येथे मालमत्ता आहे. ही मालमत्ता बऱ्याच वर्षांपासून असून ती हौसिंग सोसायटीमध्ये आहे. माझा मित्र व त्याची आई हे दोघेही ब्रिटिश पारपत्रधारक आहेत. तर आईच्या मृत्यूवर त्यांना प्रोबेट (न्यायालयीन हुकूमनामा) घ्यावे लागेल का? ते त्याला इंग्लंड किंवा भारत कोठे मिळेल? तिचा मृत्यू येथील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदणे, (तिचे नाव ७/१२ वर घालण्यासाठी) आवश्यक आहे का
– अरविंद जाधव
*आमच्या मते, तिचे इंग्लंडमध्ये मिळालेले (मृत्युदाखला) डेथ सर्टिफिकेट या ठिकाणी चालायला हरकत नाही. त्यासाठी येथे मृत्यूची नोंद पुन्हा करणे आवश्यक वाटत नाही. आपल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काही विसंगती आढळते. याचे कारण म्हणजे प्रोबेट हे ‘मृत्युपत्रावर’ घेतले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूवर प्रोबेट घेतले जात नाही. त्यांचे नाव राजकोट येथील मालमत्तेला लावताना भारतातील कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे लावावे लागेल. त्याच्यासाठी त्याला कोणता वारसा कायदा लागतो, तसेच त्याच्या मृत आईला किती वारस आहेत, त्या वारसांमध्ये काही वाद-विवाद आहेत का, गुजरात राज्यात तेथील काही स्थानिक कायदे या प्रकरणात लागू होतात का? या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. म्हणून आपण योग्य ते कागदपत्र घेऊन / दाखवून एखादा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे इष्ट ठरेल.

senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

ghaisas2009@gmail.com